नोकरीत कायमस्वरुपी घेण्याचे सरकारी आश्वासन हवेत विरल्याने राज्यातील विविध सरकारी रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापकांनी आजपासून जेजे रुग्णालय परिसरात बेमुदत आंदोलन पुकारले. आंदोलन सुरु असताना रुग्णसेवा ढासळू देणार नाही, असे आश्वासन प्राध्यापकांनी दिले असले, तरीही एमडीएस विद्यार्थी तसेच एमडीच्या प्रवेशानंतर टिचींग फॉर्मवर सही करण्यास साहाय्यक प्राध्यापकांनी नकार दिला आहे. त्यामुळे नीट समुपदेशनाचा मार्ग मोकळा होत पद्व्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नुकताच मार्ग मोकळा झालेला असताना त्यांच्या प्रवेश प्रक्रिया पुन्हा रखडणार आहेत.
( हेही वाचा : विद्यमान नगरसेवक सोशल मिडियावर का करून देत आहेत वारसदारांची ओळख? )
१५० साहाय्यक प्राध्यापकांनी दिला राजीनामा
राज्यातील विविध सरकारी रुग्णालयात ३५० साहाय्यक प्राध्यापकांना गेल्या दोन वर्षांपासून सेवेत नियमित करण्याचे आश्वासन मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी या मागणीसाठी वैद्यकीय रुग्णालयात ५०० साहाय्यक प्राध्यापक कार्यरत होते. परंतु नोकरीत कायमस्वरुपी केले जात नसल्याने कोरोनाकाळात आरोग्य विभागाने भरती केलेल्या कमी पदाच्या कायमस्वरुपी नोकरीसाठी १५० साहाय्यक प्राध्यापकांनी राजीनामा दिला. पगार कमी असला तरीही नोकरी कायमस्वरुपी मिळत असल्याने प्राध्यापकांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालनालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला.
काळ्या फिती लावून आंदोलन
दोन वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. मात्र आता सरकारने आमच्या मागणीविषयी सकारात्मक हालचाली कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी सुमारे ४० विविध सरकारी रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक जेजे रुग्णालयात एकत्र जमले. त्यांच्या आंदोलनात जेजे रुग्णालयातील ज्येष्ठ प्राध्यापकांनीही दोन प्रहारांत हजेरी लावली. या प्राध्यापकांना शैक्षणिक भत्ता, जोखमी भत्ता आदी विविध भत्ते देणे प्रलंबित आहेतत. जेजे रुग्णालयातील १४० ज्येष्ठ प्राध्यापकांत काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाची दिशा भविष्यात कदाचित मोठे स्वरुप घेईल, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून आम्हांला केवळ आश्वासने मिळत आहेत. निर्णायक हालचाली होणे आता अपेक्षित आहेत. असे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मुलकुटकर यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community