कोकणात काळ्या बिबट्या आहे पण…

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात काळ्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी काळ्या बिबट्याचे दर्शन दुर्मिळ नसल्याचा दावा केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबट्यांचे दर्शन होते. या जिल्ह्यातील काळ्या तसेच पिवळ्या तसेच रंगमिश्रित बिबट्यांची वनविभागाने गणना करावी, अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे. मात्र काळ्या बिबट्याच्या दर्शनाबाबत वनविभागाने केलेल्या पडताळणीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

बिबट्यांची गणना करण्याची मागणी

काळ्या बिबट्यांचे दर्शन अधूनमधून रत्नागिरीत होतच असते. काळ्या बिबट्या मानवी वस्तीच्या जवळ आल्याने खूप जवळून आम्हांला दिसल्याचे स्थानिक सांगतात. गुहागर येथील पर्यावरण अभ्यासक पंकज दळवी यांना गेल्या वर्षीही तहानेने व्याकुळ झालेला काळा बिबट्या दिसला होता. वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत तो पसार झाला. बिबट्याचे अधूनमधून होणारे दर्शन पाहता रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांची गणना करण्याची मागणी त्यांनी केली. हाच मुद्दा पुढे नेत पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बिबट्यांच्या गणनेची मागणी केली. गेल्या वर्षी संगरमेश्वर तालुक्यातील काळ्या बिबट्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधी काळ्या बिबट्याची पिल्लेही आढळली होती. ती खूपच लहान होती. त्यामुळे ती रंगमिश्रित आहेत की काळ्या रंगाची हे ठरवणे तेव्हा अशक्य होते. वारंवारच्या घटना पाहता दोन्ही जिल्ह्यांत बिबट्यांची गणना करणे योग्य राहील, असेही ते म्हणाले.

( हेही वाचा: विदर्भात या दिवशी परतणार उष्णतेची लाट )

काळ्या बिबट्यांचा आणि बछड्याचा व्हिडिओ रॅकोर्ड करणा-यावर कारवाई टळली

गेल्या रविवारी एका वन्यजीव छायाचित्रकाराकडून गुहागर येथील जंगलात काळ्या बिबट्या आणि बछड्याचा व्हिडिओ व्हारल झाला होता. या छायाचित्रकाराने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, ही बाब सर्वांना समजली. विनापरवाना जंगलात प्रवेश केल्यााबाबत (ट्रेसपासिंग)वनविभागाकडून गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या छायाचित्रकाराची केवळ चौकशी करुन वनविभागाने त्याला सोडले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here