पुण्यातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा स्फोट नेमका कशाचा आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिसांकडून कमालीची गुप्तता
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता एवढी होती की संबंधित व्यक्तीच्या घराच्या काचा फुटल्या आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये स्फोटाचा धक्का जाणवला. मात्र स्फोट घडल्याने पोलिसांकडून एका व्यक्तीची कसून चौकशी करत होते. या प्रकरणी पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या राशीद शेख नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली आहे.
(हेही वाचा राज्यसभेचाच फॉर्म्युला राज्यात सत्तापालट होणार? )
राशीद शेख 10 वर्षापासून सोसायटीत एकटाच रहायचा
पुण्यातील भवानी पेठ येथील विशाल सोसायटी येथे दुपारी 3 वाजता राशिद शेख हा विशाल अपार्टमेंट येथील बी विंग मधील 3 ऱ्या मजल्यावरील 306 फ्लॅट मध्ये हा स्फोट झाला. या स्फोटमध्ये त्या फ्लॅटमधील सर्व काचा तुटल्या आहे. दुपारी 3 वाजता जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा त्यानंतर पुणे शहरातील सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राशिद शेख हे इलेक्ट्रिकल मॅकेनिकल आहे. गेल्या 10 वर्षापासून या सोसायटीत एकटाच राहत आहे. राशिद शेख दररोज दुपारी 12 वाजता यायचा आणि संध्याकापर्यंत याच ठिकाणी थांबायचा आणि परत बहिणीकडे जायचा.
Join Our WhatsApp Community