७७व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराचे (Blood Donation) आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते मंगळवारी १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले.
मागील तीन वर्षांपासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अल्ट्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात भव्य रक्तदान शिबिराचे (Blood Donation) आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देशभरातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यासाठी मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया केल्या जातात, केमोथेरॅपी, रेडिएशन थेरेपी केल्या जातात. त्यामुळे वारंवार रक्ताची आवश्यकता भासत असल्याने यंदाच्या वर्षीही देशाच्या स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Independence Day Ceremony : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कर्नल नरेंद्रनाथ सुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण)
२०२० साली आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्याकडे अशाप्रकारे रक्तदान शिबिर (Blood Donation) घेण्याची संकल्पना मांडली होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, स्मारकात तुम्हाला मुलबक जागा देतो, अशी ग्वाही दिली. तेव्हापासून आतापर्यंत हे रक्तदानाचे महायज्ञ सुरू आहे. पहिल्या वर्षी ४०० हून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले. दुसऱ्या वर्षी ५००, तर तिसऱ्या वर्षी ६५० हून अधिक पिशव्या रक्तसंकलन केले होते. यावर्षीही मोठा प्रतिसाद मिळत असून, मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील, अशी माहिती मुंबई अल्ट्राचे नवीन हेगडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.
रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अल्ट्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला (Blood Donation) पहिल्या सत्रात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आयोजन स्थळावरील स्वच्छता, आसनव्यवस्था, स्वयंसेवकांचे व्यवस्थापन कौशल्य, खानपानाची सुविधा आदींबात रक्तदात्यांनी समाधान व्यक्त केले. चोख व्यवस्थापनामुळेच आम्ही दरवर्षी सावरकर स्मारकात रक्तदानासाठी येतो, अशी प्रतिक्रिया दात्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही पहा –