स्वातंत्र्य दिनी सावरकर स्मारकात होणार रक्तदान शिबीर

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

175

भारतासाठी यंदाचा स्वातंत्र्य दिन खास असणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. त्यानिमित्ताने रविवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकाधिक जणांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा राज्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला असून, रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये रोज १२०० ते १५०० रक्ताच्या बाटल्यांचा पुरवठा करावा लागत आहे. हाच रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘मुंबई अल्ट्रा’ने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मुंबईकरांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(हेही वाचा : अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणास सुरुवात)

प्लेटलेट दानही करता येणार!

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर स्मारकामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर प्लेटलेटही दान करता येणार आहे. प्लेटलेट दान करण्यासाठी दात्यांनी नोंदणी करण्याकरता ७०२१९९८७९५, ९३२४०५१८४८, ९८२००००४०० किंवा ९९२०१४२१९५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमाचे यू टु कॅन रन, एनर्जल, एआरएल लॅब, रोटरी क्लब ऑफ शिवाजी पार्क हे सहप्रायोजक आहेत.

रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहात, तर हे वाचा!

  • रक्तदानासाठी ज्यांनी पूर्व नोंदणी केली असेल, त्यांनाच रक्तदान करता येणार.
  • शिबिरा दरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार.
  • रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला मास्क, हात स्वच्छ धुणे बंधनकारक.
  • रक्तदान शिबिरापूर्वी तसेच वेळोवेळी संपूर्ण परिसर सॅनिटाईज केला जाणार.
  • रक्तदात्याची तपासणी केल्यानंतरच रक्त घेतले जाणार.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.