Blue Tick: ट्वीटरवर ब्लू टिक असणा-यांना आता मिळणार ‘या’ खास सुविधा; मस्क यांची घोषणा

238

एलाॅन मस्क यांनी ट्वीट ताब्यात घेताच महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्वीटरवर ब्लू टिक घेणा-यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शनचा पर्याय देण्यात येणार आहे. ब्लू टिकसाठी प्रतिमहिना 8 डाॅलर म्हणजेच 661 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या असणारी ब्लू टिक सिस्टिम दर्जाहीन असल्याचेही एलाॅन मस्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे ब्लू टिक असणा-यांना आता काही खास सुविधादेखील दिल्या जाणार आहेत.

एलाॅन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ कर्मचा-यांसाठीच नाही तर वापरकर्त्यांसाठीही बरेच काही बदलू शकते, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करुन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा: T-20 World Cup: भारत- बांग्लादेश आमने -सामने; या सामन्यांदरम्यानचे ‘हे’ खास रेकाॅर्ड माहित आहेत का? )

( हेही पाहा: पावसामुळे सामना थांबल्यावर वापरला जाणारा हा नियम आहे तरी काय? )

 

‘या’ सुविधा मिळणार

प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार, ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असतील, असे ट्वीट एलाॅन मस्क यांनी केले आहे. मस्क यांनी ब्लू टिक घेणा-यांसाठी काही खास सुविधा मिळणार असल्याचेही सांगितले आहे. यामध्ये रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्राथमिकता मिळेल, जे तुम्हाला स्कॅमपासून दूर ठेवेल. अधिक लांबीचा व्हिडीओ आणि ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा मिळेल. तसेच, अर्ध्याहून अधिक कमी जाहिराती येतील, असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.