मुंबईतील सुमारे ६०० झाडांवर पडणार कुऱ्हाड, उषा नगर नाल्यातच जाणार १११ झाडे

164

मुंबईतील झाडांच्या कत्तलीवरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आगामी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपुढे तब्बल ६०७ झाडे कापणे आणि ६४७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे प्रस्ताव आहेत. महापालिकेच्या विविध प्रकल्पांसह मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प, पश्चिम रेल्वे मार्ग तसेच खासगी इमारतींच्या बांधकामांमधील बाधित अशाप्रकारचे एकूण १८ प्रस्ताव प्राधिकरणाच्या बैठकीपुढे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रस्तावांमध्ये बाधित होणारी झाडे आणि पुनर्रोपित होणारी झाडे अशाप्रकारे सुमारे १ हजार २५० झाडे नष्ट होणार आहे. यामध्ये भांडुप येथील उषा नगर नाल्याच्या बांधकामांमध्ये एकूण १७५ झाडांपैकी सुमारे १५५ झाडे ही कापावी लागणार आहे. त्यामुळे झाडे कापावी लागतात म्हणून प्रकल्प रद्द करणारी शिवसेना उषा नगर नाल्याचे काम रद्द करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक मागील ऑक्टोबर २०२१ नंतर प्रथमच घेण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांनंतर बोलावण्यात आलेली प्राधिकरणाची बैठकीची तारीख प्राधिकरणाचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पुढे ढकलत येत्या शुक्रवारी, २१ जानेवारी २०२२ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये १८ प्रस्तावांमध्ये एकूण ३ हजार २३८ झाडांपैंकी ६०७ झाडे कापणे आणि ६४७ झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी मागण्यात आली आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या ताफ्यात आणखी दोन यांत्रिक झाडू! )

नाल्यांच्या प्रकल्पांची कामे थांबवणार का?

यामध्ये वांद्रे आरओबीपासून नानावटी रुगालयापर्यंत मेट्रो लाईन २, दहिसर पूर्व मेट्रो लाईन ९, अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नियोजित मेट्रो लाईन ७अ आणि एम पूर्व विभागातील मेट्रो लाईन २ बी अंतर्गत डी.एन.नगर ते मंडाले येथील मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामात एकूण १ हजार ३६७ झाडे आहेत. यामध्ये २६१ झाडे कापणे आणि ३३६ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. तर रेल्वेच्या मार्गात एकूण १५५ झाडे येत असून त्यातील ८१ झाडे कापणे आणि ७४ झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी देण्याचे प्रस्ताव आहे.

( हेही वाचा : महापालिकेचे अपयश धुण्यासाठी राज्य सरकारचा असाही पुढाकार )

भांडुप पश्चिम येथील उषा नगर नाल्याच्या बांधकामाच्याठिकाणी एकूण १७५ झाडे असून त्यातील सर्वाधिक १११ झाडे कापावी लागणार आहेत, तर ४६ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे. तर वडाळा ट्रक टर्मिनस नाला शास्त्री नगर नाला आणि ट्रांझीस्ट कॅम्प जवळील नाल्याच्या बांधकामांमध्ये एकूण ६० झाडे असून त्यातील ४२ झाडे कापावी लागणार आहेत आणि १८ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहे. एका बाजुला मोठ्याप्रमाणात झाडांची कत्तल कराव लागते म्हणून गारगाई पाणी प्रकल्प गुंडाळणाऱ्या शिवसेनेला आता उषा नगर नाला आणि शहरातील इतर नाल्यांच्या बांधकामांमध्ये कापण्यात येणारी अनुक्रमे १११ आणि ४२ एवढी झाडे आणि अनुक्रमे ४६ व १८ झाडे पुनर्रोपित करावी लागणार असल्याने या नाल्यांच्या प्रकल्पांची कामे थांबवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.