पाणीपट्टीत सहा ते सात टक्के होणार वाढ ?

मुंबईकरांच्या पाणीपट्टीत यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणीपट्टीतील वाढ कोरोनाकाळात झाली नव्हती. यंदा मात्र पाणीपट्टीत 6 ते 7 टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार असून पाणीपुरवठ्यावर झालेल्या खर्चाचा आढावा लेखा विभागातर्फे घेतला जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव तायर होण्याची शक्यता आहे.

या कामांसाठी केली जाते वाढ 

मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेला पाण्याचे स्त्रोत विकसित करणे, जलशुद्धीकरण करणे, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्ती करणे, देखभाल करणे अशी विविध कामे करावी लागतात. या सर्व कामांसाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी जून महिन्यात काही टक्के वाढ केली जाते. कोरोना व टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी ही वाढ करण्यात आली नव्हती.

( हेही वाचा :रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 198 ट्रेन रद्द; अशी तपासा रद्द झालेल्या गाड्यांची यादी )

सध्याचे दर 

भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा मोडक सागर, विहार व तुळशी या सातही धरणांतून दीड कोटी मुंबईकरांना दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रचलित धोरणानुसार, नियोजनबद्ध इमारतीतील रहिवाशांना प्रतिदिन प्रतिव्यक्त 135 लिटर या दराने पाणीपुरवठा केला जातो. इमारतीतील रहिवाशांसाठी सध्याचे दर 5.22 रुपये प्रति हजार लिटर इतके आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here