‘ही’ लक्षणं आहेत तरच गृह विलगीकरणास पालिकेची परवानगी, नवे नियम काय?

124

मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २० हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य किंवा कुठलेच लक्षण दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत? याबाबत मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेने जारी केल्या आहेत.

कोणत्या रुग्णाला राहता येणार गृहविलगीकरणात 

  • ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे असतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, शिवाय ताप नसेल, ऑक्सीजन पातळी सुद्धा नॉर्मल असेल अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास पालिकेकडून परवानगी असणार आहे.
  • कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सौम्य लक्षणे असतील किंवा कुठलीही लक्षणे नसतील अशी व्यक्ती गृह विलगीकरणात राहता येणार
  • संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात राहण्याची सोय
  • जे रुग्ण 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील आहेत किंवा जे रुग्ण कॉमोरबीडिटी आजाराचे आहेत जसे की डायबेटिक, हायपर टेन्शन, हृदयाचा आजार ,किडनीचा आजार अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आरोग्य अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर, सल्ल्यानंतरच गृहविलगिकरणात राहण्याची परवानगी दिली तरच गृहविलगिकरणात उपचार घेता येतील
  • ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल अशा रुग्णांना गृहविलगिकरणासाठी परावनगी नसेल
  • डॉक्टरांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णाला तपासल्यानंतर जर गृह विलीगिकरणात राहण्याची परवानगी दिली तरच अशा रुग्णाला गृह विलीगिकरणमध्ये राहता येणार
  • जेव्हा एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरत असेल तर त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या सदस्यांनासुद्धा गृह विलीनीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक
  • गर्भवती महिला जिची बाळंतपणाची अपेक्षित तारीख दोन आठवड्यावर आहे अशा रुग्णाला गृह विलगीकरणत ठेवता येणार नाही

(हेही वाचा – ओमायक्रॉनसाठी काय आहेत नवे होम क्वारंटाईनचे नियम, वाचा…)

  • गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःला घरातील एका खोलीमध्ये आयसोलेट करायचे आहे.
  • गृह विलगीकरणत असलेल्या रुग्णाने ट्रिपल लेअर किंवा एन 95 मास्कचा वापर करावा व दर आठ तासाने मास्क बदलावे.
  • गृह विलगीकरणत असलेल्या रुग्णाने इतरांसोबत कोणत्याही वस्तू शेअर करू नयेत, इतरांच्या वस्तू वापरू नये.
  • स्वतःहून शरीराचे तापमान सोबतच ऑक्सिजनची पातळी तपासावी. गृह विलगीकरणत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने स्वतःहून स्वच्छता ठेवावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.