BMC Budget 2023-24:अंतर्गत कर्जावर वाढवला महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा फुगा

161

मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४ चा  ५२,५५३.७४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत ६६०४ कोटी रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे तब्बल १४.५२ टक्के अधिक असून यामध्ये भांडवली खर्च २७,२४७ कोटी रुपये असून महसूली खर्च हा २५,३०५ कोटी रुपये दर्शवला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ४९९८ कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज दाखवून वाढवलेल्या अर्थसंकल्पानंतर आगामी अर्थसंकल्पाचा फुगाही अशाचप्रकारे तब्बल एक हजार कोटींची वाढ करत ५९७० कोटींचे अंतर्गत कर्ज दाखवून फुगवला गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ व दरवाढ नसणारा आनंदमयी असा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास प्रशासकांनी व्यक्त केला आहे.

मागील अर्थसंकल्पात विशेष व राखीव निधीतून ९७०६ कोटीचा निधी काढल्याचे नमुद केले होते, तर आगामी अर्थसंकल्पात या विशेष व राखीव निधीतून  १२, ७७६ काटी रुपयांचा निधी काढला जाण्याचे गृहीत धरले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत ११०० कोटींनी वाढ झाली असून सध्या महापालिकेकडे १५ हजार ६५७ कोटी रुपये एवढा इन्फ्रास्ट्रक्चर फंड उपलब्ध आहे त्यामुळे राखीव निधीमध्ये  सुमारे ५१ हजार कोटी रुपये अपेक्षित असेल आणि चालू आर्थिक वर्षात ते ५५ हजार ८०७ कोटी रुपये एवढा निधी आहे त्यामुळे महापालिकेने मागील वर्षी विविध ३१ प्रकल्पांसाठी सुमारे १८ हजार कोटींची  तरतूद केली होती, तर आगामी अर्थसंकल्पात १९,७६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24: चहलांची निष्ठा शिंदे-फडणवीसांवरच: तब्बल सहा वेळा अर्थसंकल्पात नावाचा उल्लेख )

एक काळ असा होता की महापालिकेचा महसुली खर्च अधिक आणि भांडवली खर्च अधिक असायचा,परंतु आता भांडवली खर्च अधिक आणि महसूली खर्च कमी झाला आहे. सन २०१७-१८मध्ये महसुली खर्च हा १५,०५८ कोटी रुपये होता, तर भांडवली खर्च हा ४९७८ कोटी रुपये एवढा होता, त्यामुळे महसुली खर्च ७५ टक्के आणि भांडवली खर्च हा २५ टक्के असायचा. परंतु २०२१-२२ वर्षांपासून महसुली खर्च ६५ टक्के आणि भांडवली खर्च ३५ टक्के आणि चालू आर्थिक वर्षांत महसुली खर्च ५२ टक्के तर भांडवली खर्च ४८टक्के आहे. तर आगामी वर्षांत भांडवली खर्च ५२ टक्के आणि महसुली खर्च हा ४८ टक्के असेल. त्यामुळे महसूल उत्पन्नात महापालिका आता खाली खाली येत असून भविष्यात महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी महापालिकेला महसुलाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याची गरज भासणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.