तृतीय पंथीयांसाठी अर्थसहाय्य योजने अंतर्गत २ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. याअंतर्गत तृतीयपंथीयांना कौशल्य विकास व प्रशिक्षणाकरीता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.याबरोरच घरकाम करणाऱ्या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यात पाककला व सादरीकरण, वृध्द व्यक्तींचे काळजीवाहक व मदतनीस असे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेच्यावतीने आगामी वर्षांत राबविण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी जाहीर केले. यामाध्यमातून तृतीय पंथीयांना तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. यानंतर अर्थसंकल्पातील तरतुदीसंदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेचा नियोजन विभाग यावेळीच्या अर्थसंकल्पामध्ये मात्र नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला असून यापूर्वीच्या ४० कोटी रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत सहा पटीने अधिक आहे. महानगरपालिका आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जसे की, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी यांच्यासाठी काम करत असते. जेंडर बजेट अंतर्गत महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, त्या जोमाने विकास कामात सहभागी व्हाव्यात यासाठी विविध योजना राबवल्या जातात .
( हेही वाचा: BMC Budget health 2023-24:मुंबईकरांना मधुमेही आणि रक्तदाबमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची “आरोग्यम कुटुंब” योजना )
महिला बचतगट योजना
महिला बचत गटांची संख्या वाढावी व एकत्रित सहभागातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टीने २३.०२ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. प्रति महिला बचतगट अनुदानाची रक्कम वाढवून ती जास्तीत जास्त ५०,०००/- इतकी करण्यात आली आहे. दिनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गतच्या बचत गटाला अतिरिक्त भांडवलाची रक्कम वाढवून ३५,००० रुपये एवढी करण्यात आलेली आहे.
महिलांसाठी अर्थसहाय्य योजना
महिलांच्या सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्य योजनेसाठी १००.६८ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. शिवणयंत्र, घरघंटी,मसाला कांडपयंत्र इत्यादींचा समावेश
– दुर्बल घटकातील महिलांच्या मुलीकरिता परदेशी शिक्षणाकरिता विझा तसेच तत्सम परवान्या करीता अर्थसहाय्य.
– महिलांना व्यवसाया करीता ई-बाईक, ई- रिक्षा करीता अर्थसहाय्य.
दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य योजना
दिव्यांग व्यक्तींकरिता अर्थसहाय्य योजने अंतर्गत २५.०७ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट बसेस मधून मोफत प्रवास, स्कूटर खरेदीसाठी अर्थसहाय्य, स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरीता अर्थसहाय्य व ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींसाठी एकरकमी अर्थसहाय्य देणे अशा योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरीकांसाठी अर्थसहाय्य योजना
ज्येष्ठ नागरीकांसाठी अर्थसहाय्य योजने अंतर्गत ११.३५ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रांना विविध साहित्य खरेदीकरिता अर्थसहाय्य देणे याचा समावेश आहे.
महिलांसाठी प्रशिक्षण योजना
या योजने अंतर्गत ८.१६ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांना संगणक, मार्केटिंग, शेअर बाजार, शिवणकाम, कराटे यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महिला बचतगटांचे आधारकेंद्र
रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांकरिता निवाऱ्यांचे व्यवस्थापन व परिरक्षण याकरीता १३ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन
महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तुंची मोठया प्रमाणात विक्री होऊन बचत गटाची उन्नती होण्याकरिता विभागीय व क्षेत्रीय प्रदर्शन आणि विक्री यांचे आयोजन केले जाईल.
बेघर निवाऱ्यांचे बांधकाम
बेघर निवारा करिता प्रती परिमंडळ १ बेघर निवारा याप्रमाणे एकूण २८ कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.
नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे
नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे वसतीगृह बांधकामाकरिता प्रती परिमंडळ १ महिला वसतिगृह याप्रमाणे ७ परिमंडळातील वसतीगृहाकरिता एकूण २१ कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे
पाळणाघर तथा केअर सेंटर उभारणे
पाळणाघर / केअर सेंटर बांधण्यासाठी प्रती परिमंडळ १ पाळणाघर याप्रमाणे ७ परिमंडळातील पाळणाघराकरिता एकूण ७ कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community