BMC Budget 2023-24:कचऱ्यापासून होणारे प्रदूषण रोखणार: मुंबईत लावणार १ लाख झाडे

151

काही ठिकाणी कचरा जाळल्यामुळे आणि अशाश्वत पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे धूलीकणांचे उत्सर्जन वाढून वायू प्रदुषणात भर पडते. हिवाळ्यात अधिक कचरा जाळल्यामुळे PM2.5 ची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे कचरा जाळल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदुषणाला रोखण्यासह मुंबईला सावलीयुक्त आणि हिरवागार परिसर लाभेल आणि जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर ग्रीन बफर तयार करणे या दिशेने काम करण्यात येईल. यासाठी महापालिकेने मार्गदर्शक धोरणे तयार केली आहेत.

कचरा जाळल्यामुळे होणाऱ्या वायूप्रदुषणाला रोखण्यासाठी अशा आखणार उपाययोजना:

  • घरोघरी शाश्वत कचरा वर्गीकरणासाठी नागरीकांशी संवाद साधणे आणि जागरुकता निर्माण करणे.
  • कचरा जाळण्यावर देखरेख आणि बंदीची अंमलबजावणी करणे.
  • देवनार क्षेपणभूमी येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे (टप्पा-१) बांधकाम प्रगतीपथावर आहे.
  • देवनार क्षेपणभूमी येथे पूर्वापार असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग. इ) आठ ठिकाणी ४ टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रांची उभारणी.

मुंबईतील उष्णतेचा वाढता ताण आ शहरीकरणाच्या स्पर्धात्मक मागणीचा विचार करता शहरी हरीतकरणाच्या उपाययोजना गती देण्यात येईल. जागरुकता वाढवण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका, धोरणे संबंधितांची कार्यशाळा याद्वारे शाश्वत आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील हरीतकरणा उपाय हाती घेतले जातील. याअंतर्गत पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत वृक्षारोपण पद्धतीद्वारे १ लाख झाडे लावण्यात येतील.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24(Enviornment):येत्या डिसेंबर २०२३पर्यंत बेस्टचे ३४०० बसेस इलेक्ट्रीक )

‘या’ प्रमुख ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहे.

  • मरोळ इंडस्ट्रीज असोसिएशन अर्बन फॉरेस्ट – मिठी नदीलगत
  • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे उद्यान – ४५०० झाडे
  • महाकाली केव्हज अर्बन फॉरेस्ट – ३०००० झाडे
  • स्वामी विवेकानंद उद्यान – ९००० झाडे
  • भारत वन उद्यान, मरोळ – ६००० झाडे
  • अतिप्रदुषित रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून ग्रीन बफर तयार करणे.
  • स्थानिक प्रजाती आणि लागवड पद्धतींबाबत नागरिकांना शिक्षित करण्याकरीता ‘Sustainable Micro-Greening’ मार्गदर्शक तत्त्वे स्विकारणे.

 प्रभावी देखरेख

स्वच्छ हवा कृती योजनेच्या समन्वित आणि सर्वांगिण अंमलबजावणीसाठी सुधारीत समन्वय आणि देखरेख, माहिती व्यवस्थापन, नवकल्पना आणि धोरण नियोजन आवश्यक आहे. पर्यावरण खात्याचा वातावरण कृती कक्ष हा खात्यांमधील कृतींचे समन्वय साधेल आणि समितीच्या त्रैमासिक बैठका आयोजित करेल. गेल्या वर्षभरात, बृहन्मुंबई महानगरपालिकेने हवामान अर्थसंकल्पाचा पथदर्शक प्रकल्प हाती घेतला आहे आणि या आर्थिक वर्षात ग्रीन बजेटींग प्रक्रिया सुरु करण्यासाठी

‘या’  धोरणांचा  करावा लागणार अवलंब.

  • सक्षम वायू गुणवत्ता निरिक्षण प्रणाली ५ अविरत वातावरणीय वायू गुणवत्ता देखरेख केंद्रांची उभारणी.
  • महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, निरी (NEERI), आय. आय. टी. मुंबई आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहाय्याने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उत्सर्जनाचे विभागस्तरावर मोजमाप.
  • हॉटस्पॉट मॉनिटरिंग सुरु करणे लोकल मॉनिटरींग” सुरु करणे. — शहराची कृती योजना प्रभावी करण्यासाठी “हायपर
  • मुंबईच्या वायूक्षेत्रातील वायूप्रदुषणाशी निगडीत सर्व संस्था आणि सहयोगी यांची स्वच्छ हवा समन्वय समिती तयार करणे आणि त्रैमासिक बैठका आयोजित करणे.
  • तेल शुद्धीकरण कारखाने, वीज प्रकल्प व इतर प्रदुषण निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधण्याकरीता सल्लागारांची  नियुक्ती
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वातावरण कक्षाशी समन्वय आणि त्याअनुषंगाने हवामान अर्थसंकल्पाची निश्चिती.
  • संपर्क आणि जागरुकता मोहिमा: शहरातील वायू प्रदुषणापासून आरोग्याच्या जोखिमांची माहिती देण्यासाठी जागरुकता निर्माण करणे आणि नियमितपणे आरोग्य सल्ला प्रसारीत करणे आवश्यक आहे.

यासाठी महानगरपालिका ‘या’  उपायांचा अवलंब करणार

  • वायू प्रदूषण जागरुकता मोहिम राबविण्यासाठी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांसोबत भागीदारी.
  • शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीवर इको क्लब तयार करणे. क) पर्यावरण संवर्धन आणि वृद्धीसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत सहयोग.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.