BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी ४ फेब्रुवारीला?

मुंबई महापालिकेच्या आगामी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्प गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल हे मांडणार होते. परंतु आता हा अंदाजित अर्थसकंल्प काही कारणास्तव दोन दिवस पुढे ढकलत येत्या शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक चहल यांना काही कारणास्तव रजेवर गेल्याने अर्थसंकल्प सादरीकरण हे शनिवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा : Budget 2023 : बजेटपूर्वीचा हलवा समारंभ का आयोजित करतात? जाणून घ्या ही परंपरा )

चहल हे प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडणार

मुंबई महापालिकेत तब्बल ३६ वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर ते प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहे. एप्रिल १९८४ मध्ये द.म.सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५मध्ये जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल २७ वर्षांनी चहल हे प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२२-२३ अर्थसंकल्प सादर करताना सुमारे सात हजार कोटींची वाढ करत ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटींचा असा ८ पूर्णांक ४३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०२१-२२चा ११.५१ कोटी रुपये शिलकीचा ३९ हजार ०३८कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे सन २०२३ २४ चा अर्थसंकल्प आगामी गुरुवारी २ फेब्रुवारी २०२३ रोजी मांडला जाण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे तारीखही निश्चित करण्यात आली होती, परंतु महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना काही कारणास्तव बाहेर जावे लागत असल्याने त्यांनी अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख पुढे ढकलावी लागल्याची माहिती मिळत आहे. पुढील शुक्रवारपर्यंत चहल यांची सुट्टी असल्याने शनिवारी ४ फेब्रुवारी २०२३ला हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here