BMC Election 2022 : बोरीवली आर मध्य विभागात पटेल वगळता सर्वच सेफ, तरीही…

महापालिकेच्या आर मध्य अर्थात बोरीवली भागात एकूण आठ नगरसेवकांचे प्रभाग असून मागील निवडणुकीत या प्रभागांमध्ये असलेल्या महिला आरक्षित तुलनेत नव्या आरक्षणातही महिलांसाठी दोन प्रभाग राखीव झाले आहे. विशेष म्हणजे ओबीसी असलेले दोन्ही प्रभाग यंदा महिला झाले आहेत. तर यापूर्वी असलेले खुले सहाही प्रभाग पुन्हा खुलेच राहिलेले असून जे दोन महिला प्रभाग होते तेही यंदा खुले झाल्याने आर मध्य विभागात नगरसेवकांपुढे खुलेच आव्हान असणार आहे.

नव्या आरक्षणातही महिलांसाठी दोन प्रभाग राखीव

या आर मध्य विभागात ३ शिवसेना, १ कॉंग्रेस आणि ०६ भाजपचे नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले होते. परंतु यंदा काँग्रेसच्या श्वेता कोरगावकर यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे,त्यामुळे त्यांना आपल्या प्रभागात दावेदारी सांगता येणार आहे, तर भाजपचे जितेंद्र पटेल यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्यांना अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तर शिवसेनेच्या रिध्दी खुरसुंगे, गीता सिंघण आणि संध्या दोशी यांचे प्रभाग खुले झाल्याने त्यांना पुन्हा आपल्याच प्रभागात उभे राहण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या तिन्ही नगरसेविकांचे प्रभाग मागील निवडणुकीत खुले प्रवर्ग होते, त्यामुळे त्यांचे प्रभाग पुन्हा खुले झाले असले तरी त्यांच्यासाठी सेफ झोनच आहे.

तर मागील निवडणुकीत महिला आरक्षित प्रवर्गातून लढणाऱ्या भाजपच्या आसावरी पाटील आणि अंजली खेडकर या दोन्ही नगरसेविकांचे प्रभागही खुले झाले आहे. त्यामुळे यांना पुन्हा पक्षाकडून संधी दिली जाते का अन्य उमेदवाराला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विद्यार्थी सिंह आणि ज्यांनी मुंबईमध्ये सर्वांधिक मते मिळवतानाच सर्वांधिक मताधिक्यही मिळवले होते, ते भाजपचे नगरसेवक प्रविण शाह यांचाही प्रभाग पुन्हा एकदा खुला झाला आहे.

 • प्रभाग ०९, ओबीसी,(श्वेता कोरगावकर,काँग्रेस) नवीन प्रभाग १०,( महिला)
  नवीन प्रभाग रचना : गोराई,एक्सर, न्यू लिंक रोड
 • प्रभाग़ १०, ओबीसी,(जितेंद्र पटेल,भाजप) नवीन प्रभाग ११, (महिला)
  नवीन प्रभाग रचना : योगी नगर,डॉन बॉस्को स्कूलचा परिसर, गोविंद नगर, सी.के.पी. नगर, देवीदास रोड,प्रेम नगर रोड,सोडावाला लेन,
 • प्रभाग़ ११, खुला,(रिध्दी खुरसुंगे) नवीन प्रभाग १३, (खुला प्रवर्ग)
  नवीन प्रभाग रचना : काजूपाडा, नॅशनल पार्कपरिसर
 • प्रभाग १२, खुला,(गीता सिंघण,शिवसेना) नवीन प्रभाग १४,(खुला प्रवर्ग)
  नवीन प्रभाग रचना : कुलुपवाडी, सदगुरु नगर, रहेजा इस्टेट,दत्तपाडा रोड
 • प्रभाग १३,खुला,(विद्यार्थी सिंह, भाजप) नवीन प्रभाग : १६ ( खुला)
  नवीन प्रभाग रचना : असरा कॉलनी,जया नगर, सुमेर नगर दत्तपाडा रोड गांवदेवी रोडपासून एस.व्ही.रोडपर्यंत,महात्मा गांधी जंक्शन, टिळक रोड
 • प्रभाग१४,महिला,(आसावरी पाटील, भाजप) नवीन प्रभाग १५,( खुला)
  नवीन प्रभाग रचना :राजेंद्र नगर, मागाठाणे
 • प्रभाग़ १५, खुला,(प्रवीण शहा,भाजप) नवीन प्रभाग १२,( खुला)
  नवीन प्रभाग रचना : विवेकानंद रोड, पोईसर बस डेपा,बोरसा पाडा चंदावरकर रोड, सोडावाला लेनपासून रामदास सुत्राळे मार्ग जंक्शनपर्यंत, देव नगर देरासर लेन
 • प्रभाग़ १६, महिला,(अंजली खेडकर, भाजप) नवीन प्रभाग १७,( खुला)
  नवीन प्रभाग रचना : बाभई नाका, वजिरा नाका,अष्ट विनायक नगर
 • प्रभाग़ १७, खुला,(बीना दोशी,भाजप) नवीन प्रभाग १८,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : कस्तुरपार्क, महावीर नगर,,शिंपोली रोड, हरिदास नगर,बोरसापाडा रोड
 • प्रभाग़् १८, खुला,(संध्या दोशी,शिवसेना) नवीन प्रभाग १९,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : चारकोप सेक्टर ५, ८ व ९

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here