वरळीत कोण ठरणार आदित्य ठाकरेंचे लाडके…

वरळीतील जी दक्षिण विभागात जिथे मागील निवडणुकीत तीन प्रभाग खुले आणि दोन प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्ग आणि प्रत्येकी एक ओबीसी व महिला प्रवर्गासाठी राखीव होते, तिथे नवीन प्रभाग आरक्षणात चार प्रभाग खुले झाले असून ३ महिला आरक्षित झाले आहे. आणि एक प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्ग म्हणून आरक्षित झाला आहे. दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि बेस्ट समिती अध्यक्ष पद भूषवणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना आता बदललेल्या आरक्षणामुळे पुन्हा संधी मिळेल का की, या विभागाचे आमदार असलेले व मंत्री आदित्य ठाकरे हे नवीन चेहऱ्यांना संधी देता का हा महत्वाचा विषय आहे.

( हेही वाचा : बोरीवली पश्चिममधील पुलाला “जनरल बिपीन रावत उड्डाणपूल” असे नाव देण्याची भाजपची मागणी)

या विभागात माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, संतोष खरात, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आशिष चेंबूरकर यांचे प्रभाग खुले झाले आहेत. चेंबूरकर यांच्या जुन्या प्रभागाचे दोन प्रभाग झाले असून एक प्रभाग खुला आणि एक प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे प्रभाग २०० हा चेंबूरकर यांच्यासाठी खुला झाल्याने ते थोडक्यात बचावले. पण यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्ग झाल्याने लॉटरी लागलेल्या ऍड संतोष खरात यांचा प्रभाग खुला झाल्याने, त्यांची जागा धोक्यात आली आहे. आता या प्रभागात अनेकांची दावेदारी सांगितली जाणार आहे. तर महापौर पद भूषवणाऱ्या स्नेहल आंबेकर यांचा पत्ता मागील निवडणुकीतच कापणार होते, पण प्रभाग १९८ अनुसूचित जाती करता आरक्षित झाल्याने त्यांना पुन्हा लॉटरी लागली होती. पण यावेळेस त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला असला तरी त्यांना पक्ष संधी देण्याची शक्यता कमी वाटते. परंतु पुन्हा एकदा नशीब त्यांना साथ देणार असून नव्याने निर्माण झालेला २०४ हा प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. त्यामुळे या प्रभागात जर अन्य कुणी मजबूत उमेदवार नसल्यास स्नेहल आंबेकर यांची वर्णी लागली जाऊ शकते.

मनसेतून शिवसेनेत आलेले दत्ता नरवणकर यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांना आपल्या बायकोला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार किंवा किंवा आजूबाजूच्या खुल्या प्रवर्गात तरी जावे लागेल. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग खुला झाल्याने तिथे त्यांना पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जर आंबेकर यांना तिकीट नाकारल्यास किंवा त्यांना नवीन प्रभागात उमेदवारी दिल्यास पेडणेकर यांना त्या महिला आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी मिळू शकते.

आजवर खुला प्रवर्ग न झाल्याने हेमांगी वरळीकर यांची वर्णी लागली. परंतु या वेळेस हा प्रवर्ग खुला झाल्याने वरळी कोळीवड्यातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे शिवसेना पदाधिकारी आणि माजी सिनेट सदस्य हरिष वरळीकर यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वरळीकर हे सेवानिवृत्त झाल्याने तेही यंदा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने हेमांगी वरळीकर यांना घरी बसावे लागणार आहे. हरिश वरळीकर हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असून सर्वाधिक वेळा नगसेवक बनण्याचा मान मिळवणाऱ्या मणी शंकर कवठे यांना उमेदवारीतच गनिमी काव्याने शिवसेनेने बाद केले आणि संजय अगलदरे यांना निवडून आणले होते.

असे आहेत प्रभाग आणि त्याची रचना

 • प्रभाग १९३, ओबीसी,(हेमांगी वरळीकर,शिवसेना) नवीन प्रभाग १९९,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : वरळी कोळीवाडा, वरळी स्पोर्टस क्लब, महाराष्ट्र रायफल असोशिएशन, ग्रीन लॉन स्कूल आय एन एस तारा
 • प्रभाग १९४, खुला,(समाधान सरवणकर,शिवसेना) नवीन प्रभाग २०१,(महिला)
  नवीन प्रभाग रचना : गोपाळ नगर, प्रभादेवी पोस्ट ऑफिस, सेच्युरी नगर, सिग्मा इस्टेट, समेर त्रिनिटी प्रभादेवी, शिवदया प्रबोधनी आयएएस अकॅडमी, दूरदर्शन, कामगार नगर, अप्पासाहेब मार्ग खेडगल्लीपर्यंत, न्यू प्रभादेवी मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग
 • प्रभाग १९५, अनुसूचित जाती,(संतोष खरात,शिवसेना) नवीन प्रभाग २०३,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : बीडीडी चाळ वरळी, नीलगंगा नगर, दिपक सिनेमा, कमला मिल कंपाऊंड, पेननसुला बिझनेस पार्क, वरळी पासपोर्ट कार्यालय, बाळासाहेब ठाकरे उदयान, जी एम भोसले मार्ग, पांडुकर बुधकर मार्ग
 • प्रभाग १९६, खुला,(आशिष चेंबूरकर,शिवसेना) नवीन प्रभाग २००,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : आर बी आय वसाहत, रवींद्र नाट्यगृह, प्रभादेवी मंदिर, वरळी बस डेपो, वरळी आरटीओ हॉस्पिटल, जांबोरी मैदान
 • नवीन प्रभाग, प्रभाग १९६ व १९७ : नवीन प्रभाग २०४,(अनुसूचित महिला)
  नवीन प्रभाग रचना : थडानी मार्गापासून सिध्दार्थ नगर, डेरी कॉलनी, महापालिका इंजिनिअरींग हब,वरळी, प्रेम नगर, शास्त्री गार्डन, जिजामाता नगर, डॉ ई मोजेस मार्ग,
 • प्रभाग १९७, खुला,( दत्ता नरवणकर,शिवसेना) नवीन प्रभाग २०५,(महिला)
  नवीन प्रभाग रचना : वरळी नाक्यापासून जिजामाता नगर, नेहरु सायन्स सेंटर,हाजीअली दर्गा, रेसकोर्स, फिनिक्स मिल,गणपतराव कदम मार्ग
 • प्रभाग १९८, अनुसूचित जाती,(स्नेहल आंबेकर,शिवसेना) नवीन प्रभाग २०२,(महिला)
  नवीन प्रभाग रचना : परेल रेल्वे वर्कशॉप, इंडियाबूल्स, दर्शन हाईट्स, मफतलाल कंपाऊंट, सीताराम मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, गावडे चौक
 • प्रभाग १९९, महिला,(किशोरी पेडणेकर,शिवसेना) नवीन प्रभाग २०६,(खुला)
  नवीन प्रभाग रचना : डिलाईट रोड पोस्ट ऑफीस, वेस्टर्न रेल्वे क्रीकेट ग्राऊंड,महालक्ष्मी स्टेडियम, फेमस स्टुडीओ, शक्ती मिल, धोबीघाट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here