संजना घाडी, सिध्देश पाटेकर, ऋषीकेश ब्रीदला संधी; ओझांना सरकावे लागणार बाजूला

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीनंतर महापालिकेच्या आर उत्तर विभागातील नगरसेवकांची चिंताच मिटली आहे. शिवसेनेचे संजय घाडी आणि भाजपचे जगदीश ओझा वगळता सर्वांचे प्रभाग खुले झाले आहेत. संजय घाडी यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे संजय घाडी यांना आता घरी बसावे लागणार आहे, तर आजूबाजूचे प्रभागही खुले झाल्याने आणि महिला आरक्षित वॉर्ड झाल्याने भाजपचे जगदीश ओझा यांना आता दुसऱ्या वॉर्डचा शोध घ्यावा लागणार आहे.

( हेही वाचा : कोरोनासोबतच नोरोव्हायरसचे सावट! भारतात आढळले दोन रुग्ण; अशी घ्या काळजी )

२०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत आर उत्तर विभागात एकूण ८ पैकी सहा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले होते, परंतु नव्या प्रभाग रचनेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या एकेका नगरसेवकांच्या प्रभागाचे आरक्षण बदलले असून या प्रभाग क्रमांक २ आणि प्रभाग क्रमांक ०५ हे महिला आरक्षित झाले आहेत. नवीन प्रभाग रचनेमध्ये या विभागांमध्ये एकूण ९ प्रभागांची संख्या झाली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ७ हा नव्याने वाढलेला आहे. हा वाढलेला प्रभाग खुला झाल्याने शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षांमधील इच्छुकांची मोठी मांदियाळी तयार असणार आहे.

विशेष म्हणजे या प्रभागात भाजप हरिष छेडा यांचा प्रभाग खुला झाला असून शिवसेनेच्या तेजस्विनी घोसाळकर, बाळकृष्ण ब्रीद सुजाता पाटेकर, हर्षद कारकर आणि शितल म्हात्रे यांचे प्रभागही खुले झाले आहे. तेजस्विनी घोसाळकर यांचा प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यासाठी इच्छुक असणार आहे, तर सुजाता पाटेकर यांचा प्रभाग खुला झाल्याने त्यांचे पती माजी नगरसेवक उदेश पाटेकर किंवा ते आपल्या मुलाला संधी देऊ शकतील. तर शिवसेनेचे बाळकृष्ण ब्रीद यांचा मुलगा ऋषीकेश हा युवा विधानसभा समन्वय असल्याने त्याला संधी देणार की स्वत: निवडणूक लढवणार असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे आपला प्रभाग महिला आरक्षित होईल यासाठी हर्षद कारकर यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने प्रभागात कामे सुरु करून त्यांची ओळख करून देण्यास सुरवात केली होती, परंतु त्यांचा प्रभाग खुला झाल्याने बायको ऐवजी आता त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीतील आरक्षण : ३ महिला, ३ खुला आणि २ ओबीसी

या निवडणुकीतील आरक्षण : २ महिला, ७ खुला प्रवर्ग

प्रभाग १ महिला : तेजस्विनी घोसाळकर, शिवसेना :नवीन प्रभाग १ (खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : महापालिकेची उत्तर सीमा, होली क्रॉस रोड, आयसी कॉलनी रोड, कांदरपाडा, दहिसर नदी.

प्रभाग २ खुला :  जगदीश ओझा, भाजप : नवी प्रभाग २ (लेडीज प्रवर्ग)
प्रभाग रचना : महापालिकेच्या उत्तर सीमा नाक्यापासून दहिसर चेकनाका अलियावर जंग मार्गपर्यंत रामनारायण कॉलेजपासून वामनराव सावंत मार्गापर्यंत, अवधूत नगर, आनंद नगर,एन एल संकुल, सुधींद्र नगर परिसर.

प्रभाग ३ खुला : बाळकृष्ण ब्रीद, शिवसेना : नवीन प्रभाग ३ (खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : दहिसर चेकनाक्यापासून नॅशनल पार्क पश्चिम सीमेपर्यंत, केतकीपाडा, वैशाली नगर, चेकनाका ही प्रमुख ठिकाणे.

प्रभाग ४ महिला : सुजाता पाटेकर, शिवसेना : नवीन प्रभाग ४ (खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : घरटनपाडा, कोकणीपाडा,एकता नगर, रावळपाडा, एन.जी. पार्क.

प्रभाग ५ ओबीसी : संजय घाडी,शिवसेना : नवीन प्रभाग ५(महिला प्रवर्ग)
प्रभाग रचना : अशोक वन, चोगले नगर,गणेश नगर, चिंतामणी नगर, एस.टी.डेपोचा परिसर.

प्रभाग ६ ओबीसी : हर्षद कारकर, शिवसेना : नवीन प्रभाग ६(खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : अंबावाडी, रतन नगर दहिसर पोलिस स्टेशनचा परिसर, एस.एन.दुबे रोडच्या दक्षिण बाजुने पूर्वेकडे दवे रोडपर्यंत.

नवीन प्रभाग क्रमांक ७ : (विद्यार्थी सिंह, ओझा यांचे काही प्रभाग) नवीन आरक्षण (खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : मराठा कॉलनी, सुकरवाडी, दौलत नगरचा परिसर, पश्चिम रेल्वे लाईनच्या बाजुने उत्तरेकडील ठिकाणापर्यंत.

प्रभाग ७ महिला : शितल म्हात्रे, शिवसेना : नवीन प्रभाग ८(खुला प्रवर्ग)
प्रभाग रचना : लालबहादूर शास्त्री नगर, म्हात्रे वाडी, कांदरपाडा, वाय.आर. तावडे रोडच्या उत्तर बाजुने पश्चिमेकडे दहिसर नदी ओलांडून लक्ष्मण म्हात्रे रोडपर्यंत, वीर हनुमान रोड, होली क्रॉस रोड.

प्रभाग ८ खुला : हरिष छेडा, भाजप : नवीन प्रभाग ९ (महिला प्रवर्ग)
प्रभाग रचना : भगवती रुग्णालयाचा परिसर, माऊंट पोईसर, देवकी नगर, या प्रमुख ठिकाणांसह देवीदास रोड, आय.सी. कॉलनी, बी.डी. आंबेडकर मार्ग, लक्ष्मण म्हात्रे रोडची हद्द.

एक प्रतिक्रिया

  1. बातमी मागील बातमी असावी,निवडणुकीचे वारे वाहू लागले की मॅनेज करून बातम्या प्रसिद्ध करण्याचे कार्यक्रम सुरू होतात ,निदान आपल्या हिंदुस्थान च्या पोस्ट तरी त्यात नसाव्यात ,हीच अपेक्षा,,

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here