मुंबईतील ४० विद्यमान नगरसेविका प्रभाग आरक्षणातच पास

136

मुंबई महापालिकच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली असून याअंतर्गत २३६ पैंकी ११८ महिला प्रवर्गातील प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिलांच्या प्रवर्गातील प्रभागांमध्ये विद्यमान ४० नगरसेविकांचे प्रभाग सुरक्षित राखले गेले आहेत. त्यामुळे ४० नगरसेविकांसमोरील संकट दूर झाले असून त्यांचा पुन्हा महापालिकेत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

( हेही वाचा : आशिष चेंबूरकर, गंगाधरे, बब्बू खान, सुषम सावंत यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका)

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रभागांच्या आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला गटात १०९ प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रभाग आरक्षणामध्ये अनेक महापालिकेतील ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला तरी विविध पक्षांच्या विद्यमान नगरसेविकाचे प्रभाग पुन्हा महिला झाल्याने त्यांना पुन्हा तिकीट मिळवण्याचा मार्ग अगदी सोपा झाला आहे. विद्यमान नगरसेविका असल्याने प्रभागातील प्रबळ दावेदारी मानली जाते.अशाप्रकारे एकूण ४० नगसेविकांचे प्रभाग महिला राखीव झाल्याने त्या सर्व महिला लोकप्रतिनिधी आता सुरक्षित झोनमध्ये आले आहे.

या आरक्षण सोडतील शिवसेनेच्या विद्यमान १३ महिला आहेत, तर भाजपच्या १६ नगरसेविकांचे प्रभाग महिला राखीव झाले आहे.याशिवाय काँग्रेसचे ०९, अपक्ष १ आणि राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचेही समावेश आहे.

महिला राखीव झालेल्या विद्यमान नगरसेविकांची पक्षनिहाय नावे

शिवसेना : वैशाली शेवाळे, प्रतिमा खोपडे, रोहिणी कांबळे, समृध्दी काते, प्रविणा मोरजकर, उर्मिला पांचाळ, सुवर्णा करंजे, अर्चना भालेराव, अंजली नाईक, चित्रा सांगळे, सान्वी तांडेल, स्मिता गांवकर, सुजाता सानप

भाजप : ज्योती अळवणी,प्रतिभा गिरकर, प्रियंका मोरे, प्रिती सातम, हेतल गाला, आशा मराठे, राजेश्री शिरवडकर, सुरेखा पाटील, योगिता कोळी, सुधा सिंग, स्वप्ना म्हात्रे, वैशाली पाटील,शीतल गंभीर देसाई,मिनल पटेल, अनुराधा पोतदार, रिटा मकवाना

काँग्रेस : संगीता हंडोरे, निकिता निकम,श्वेता कोरगांवकर, गंगा माने, सोनम जामसूतकर, अल्पा जाधव, तुलिफ मिरांडा,पुष्पा कोळी,आफरीन शेख

राष्ट्रवादी काँग्रेस : मनिषा रहाटे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.