BMC Election : महापालिका प्रभाग आरक्षणावर २३२ हरकती व सूचना

133

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबाबत मागील १ तारखेपासून नोंदवण्यात येत असून सोमवारपर्यंत तब्बल २३२ जणांनी हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पाच दिवसांमध्ये केवळ २५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या, तर सोमवारी एकाच दिवशी २०७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकती व सूचनांचे निराकारण येत्या सोमवारपर्यंत आरक्षणाची अंतिम सूची तयार करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रभाग आरक्षणा विरोधात काँग्रेस पक्षाने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

( हेही वाचा : भांडुप संकुलात पावसाळी पाणी शिरण्याची भीती, पंपांची केली अतिरिक्त व्यवस्था)

सोमवारपर्यंत तब्बल २३२ हरकती 

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता ३१ मे रोजी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या प्रभाग आरक्षणाच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी १ ते ६ जूनचा कालावधी होता. या कालावधीत माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आदींनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शेवटच्या अर्थात सोमवारच्या दिवसापर्यंत एकूण २३२ हरकती व सूचना नोंदवल्या गेल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे १३ जून २०२२ रोजी आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून प्रभागनिहा अंतिम आरक्षणाची यादी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल,असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

काँग्रेस व समाजवादी पक्षाने या आरक्षण सोडतीवर शंका उपस्थित करत शिवसेनेने अन्याय केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकारी याबाबत हरकती नोंदवणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती.

१ ते ५ जून २०२२ : प्राप्त हरकती व सूचना २५

६ जून २०२२ : प्राप्त हरकती व सूचना २०७

सार्वत्रिक निवडणूक -2022 प्रभाग निहाय आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने हरकती सूचना,नमुना पुढीलप्रमाणे

  • एकूण ५४ हजार लोकसंख्येपैकी केवळ पाच हजार लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. सर्वसाधारण करावा.
  • प्रभात महिलांसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे पुरुष वर्गावर अन्याय झालेला आहे
  • मुलुंड विभागातील अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या (७१३७) या प्रभागात असल्याने हा प्रभात अनुसूचित जाती करिता आरक्षित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आळीपाळीने आरक्षण पद्धती अवलंबलेली नाही असे दिसते.
  • हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित केला आहे, त्यावर पुनर्विचार करणे बाबत.
  • या प्रभागाच्या अनुषंगाने संबंधित एकूण 94 तक्रारी आलेल्या आहेत. एकाच प्रकारच्या पत्राच्या अनेक तक्रारदारांनी नाव आणि पत्ता बदलून अशा या तक्रारी केलेल्या आहे.
  • तक्रारीचे स्वरूप असा आहे की, – प्रभाग …….ला अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावं त्याऐवजी जे ……. ला दिलेला आहे ते रद्द करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.