वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६०मधून निवडून आलेल्या भाजपचे योगीराज दाभाडकर यांनी तीन वेळा सुधार समिती व तीन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भुषवणाऱ्या शिवसेनेचे शैलेश फणसे यांचा पराभव केला होता. परंतु नव्या प्रभाग आरक्षणात हा प्रभाग आता खुला झाला असून दाभाडकर यांच्यासमोर पुन्हा फणसे यांना आव्हान असणार आहे. त्यामुळे फणसे यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवल्यास यंदा दाभाडकर यांच्यासाठी ती कांटे की टक्कर असणार आहे. दाभाडकर यांच्यासाठी जमेची एकमेव बाजु आहे ती म्हणजे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या जोत्स्ना दिघे या भाजपमध्ये आल्या असून त्यातच दाभाडकर यांनी पाच वर्षांत मतदार संघावर पाडलेल्या प्रभावामुळे फणसे यांनाही हा प्रभाग तेवढा सहज काढता येईल, असेही चित्र नाही.
( हेही वाचा : Bmc election 2022 mulund T Ward;शिवसेनेला नामोहरम करणाऱ्या सोमय्यांचा मुलगा बसणार घरी; सोमय्यांच्या घरातून आता निवडणूक लढवणार कोण?)
फणसे आणि दाभाडकर यांच्यात होणार का कांटे की टक्कर
वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६० हा आता ६२ क्रमांकांचा झाला असून मागील निवडणुकीप्रमाणेच या प्रभागाचे आरक्षण हे खुले राहिलेले आहे. त्यामुळे या मतदार संघात दाभाडकर विरुध्द फणसे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत फणसे यांना केवळ ५०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. दाभाडकर यांना ६९०८ मते तर यशोधर फणसे यांना ६४०६ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या उमेदवार माजी नगरसेविका जोत्स्ना दिघे यांना ३४७९ मते मिळाली होती. हा मतदार संघ महिला आरक्षित झाला असता तर दिघे यांना संधी प्राप्त झाली असती. परंतु प्रभाग खुला झाल्याने दिघे यांची संधी हुकली गेली.
( हेही वाचा : मुंबई – गोवा महामार्गाचे काम संथगतीने; उच्च न्यायालयाची नाराजी)
या मतदार संघात शिवसेना, भाजप अशीच सरळ लढत राहणार असून दिघे यांना वैयक्तीक आणि काँग्रेस पक्षाची मते मिळाली होती. पण प्रभागात आता काँग्रेस कुणाला उमेदवारी देतंय यावर शिवसेना आणि भाजप उमेदवारांमधील मतांचा फरक दिसून येणार आहे. मागील पाच वर्षात दाभाडकर यांनी पहिल्या टर्म मध्ये काही कामे करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरीकडे फणसे यांनी नगरसेवक नसतानाही पक्षाच्या संघटनात्मक कामाद्वारे लोकांच्या संपर्कात राहिल्याने दाभाडकर यांच्यासाठी हा प्रभाग राखणे तेवढेही सोपे नाही.
प्रभाग क्रमांक ६०, खुला प्रवर्ग (योगीराज दाभाडकर,भाजप), नवीन प्रभाग ६२ (खुला प्रवर्ग)
नवीन प्रभाग रचना : यमुना नगर,लोखंडवाला कॉम्प्लेक्स, भुदरगड कॉलनी, इंद्रदर्शन क्रॉस रोड, पी.एल. देशपांडे मार्ग,वर्सोवा मार्ग, लोखंडवाला लेक रोड, बेस्ट कॉलनी रोड, अच्युतराव पटवर्धन मार्ग,मोगरा नाला व न्यू लिंक रोडचा काही भाग
Join Our WhatsApp Community