मुंबईतील मेट्रो लाईन ३चे काम आता पूर्णत्वास येत असून ही भुयारी कामे आता पूर्ण होत असल्याने रस्त्यांसह पदपथांच्या सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जाणार आहे. एमएमआरडीए, महापालिका, उद्यान विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त माध्यमातून सुशोभिकरणाची कामे केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक बेटे आणि पदपथांचे सुशोभिकरण केले जाणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून सुशोभिकरण
मुंबई मेट्रो लाईन २ ए व मुंबई मेट्रो लाईन ७ चे मेट्रो मार्ग गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आल्या आहेत. या मेट्रो रेल्वेची कामे पूर्ण झाली असून कुलाब्यापासून पश्चिम उपनगरापर्यंत धावणाऱ्या मेट्रो लाईन३चे शहरातील भुयारी रेल्वे स्थानकाचे काम आता पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होत असल्याने स्थानक परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवरील वाहतूक बेटांचा विकास करून त्यांचे सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
शहरातील कुलाबा ते सीएसटी दरम्यानच्या भुयारी मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होत असल्यामुळे या भागातील सुशोभिकरणाबाबत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिकेच्या उद्यान विभागासह एमएमआरडीएचे अधिकारी व ए विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावली होती. यामध्ये संबंधितांनी त्यांनी वाहतूक बेटे तसेच पदपथाचे सुशोभिकरण करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. प्रायोगिक तत्वावर कुलाबा कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो या चार रेल्वे स्थानकांच्या परिसरातील पदपथ व वाहतूक बेटांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यानंतर इतर भागातील मेट्रो रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी समन्वय राखून ए विभागाचे अधिकारी व उद्यान विभागाचे अधिकारी हे सुशोभिकरणाचे कम करून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community