महापालिकेच्या आठ योध्दयांचा सन्मान!

मुंबई महानगरपालिकेच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक म्हणून सत्कार करत कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

कोरोना साथ रोगाच्या काळात महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि कामगार यांनी, ज्या समर्पित भावनेने आपले कर्तव्य दिवस-रात्र न पाहता बजावले. त्या कर्तव्य भावनेने केलेल्या कामाची दखल आता विविध संस्थांकडून घेत, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. मुंबईतील ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई डाऊनटाउन सीलँड’ या संस्थेने मुंबई महानगरपालिकेच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक म्हणून सत्कार करत कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

यांचा झाला सन्मान

ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, ८ कोविड योध्दयांचा सन्मान करत त्यांना व्यवसायिक उत्कृष्टतेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, कस्तुरबा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी कैलाश हिवराळे यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमादरम्यान, संबंधित रोटरी क्लबचे अध्यक्ष आरटीएन चंद्रप्रभा खोना आणि व्यावसायिक संचालक आरटीएन सुगरा बगसरावाला यांच्या हस्ते, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक गौरविण्यात आले.

(हेही वाचा: पाणी बिलांसाठी आता ३१ मार्चपर्यंत ‘अभय’!)

कर्मचा-यांचे कौतुक

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांनी ‘कोविड’ काळात अत्यंत समर्पित भावनेने सातत्यपूर्ण काम केले. अनेकांनी तर अक्षरशः दिवसरात्र आपले कर्तव्य बजावले. तर अनेक जण सलग तीन महिने आपल्या घरीही न जाता, आपले कर्तव्य बजावत मुंबईकरांची सेवा करीत होते. महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोविडची लागण झाली. तर अनेकांचे कोविडमुळे दुर्दैवी मृत्यू झाले. अविरतपणे समर्पित भावनेने काम करणाऱ्या सर्वच कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे रोटरी क्लबच्यावतीने आरटीएन सुनील मेहरा यांनी कौतुक करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रती आदर भावना व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here