जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने १५ डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला (DUSC) नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर वेंगसकर यांनी असा दावा केला की, कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही आणि क्लब नियमांनुसार, चालत आहे.
(हेही वाचा – भारीच! महाराष्ट्रातील ‘या’ १९ रेल्वे स्थानकांचा होणार मेकओव्हर)
दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या शेजारी असलेल्या दादर (पूर्व) येथील पारशी कॉलनी परिसरात शंभर वर्षे जुन्या दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबच्या सदस्यांनी ही तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दादर पारसी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ बाना यांनी कमी जागेत नवीन खेळपट्टी तयाप केल्याचा आरोप केला आहे. एफ नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त गजानन बेल्लाले यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे.
दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ बाना यांनी कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप दिलीप वेंगसकर यांच्यावर केला आहे. दरम्यान त्यांना दिलेल्या खेळपट्टीची जागा वाढवून त्यांनी नवीन खेळपट्टी तयार केली, त्यामुळे ही वाढीव जागा त्यांचीच असल्याची माहिती सादर करण्यासाठी महापालिकेकडून त्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ बाना यांनी केलेल्या आरोपानुसार, कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केली आहे. एफ नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त गजानन बेल्लाले यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली होती. यावेळी बाना यांनी पत्रात असे म्हटले की, दोन खेळपट्ट्या फारच वेगळ्या आहेत आणि हे खेळाडूंसाठी धोकादायक आहे. ज्यामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो. इतकेच नाही तर खेळपट्ट्या योग्य अंतरावर असतील यासाठी काही नियम तयार करावेत, असीही त्यांनी विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community