मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश पवार यांनी महापालिका आयुक्त कार्यलयात उपायुक्त म्हणून या पदावर अनेक वर्ष सेवा बजावली आहे. सध्या ते सह आयुक्त(सुधार) या पदावर कार्यरत आहेत.
( हेही वाचा : कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण-गोव्यासाठी आणखी नवा रस्ता )
प्रशासकीय कारणास्तव नेमणूक
नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश २२ मार्च २०२२ रोजी नगर विकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत. यामध्ये रमेश पवार यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रमेश पवार यांनी सहआयुक्तपदावरून कार्यमुक्त होऊन नाशिक महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे म्हटले आहे, असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
अनुभवाचा फायदा
रमेश पवार यांनी सहाय्यक आयुक्त या पदावर विविध प्रशासकीय विभागांमध्ये सेवा बजावली आहे. त्यानंतर उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाल्यावर त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमवेत आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त पदाचा पदभार समर्थपणे पेलला होता. त्यानंतर कोविड काळामध्ये आरोग्य विभागाची प्रारंभीची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता निश्चितच नाशिक महापालिकेला होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community