रस्ते व वाहतूक खात्याने विभाग कार्यालये आणि वाहतूक पोलीस यांच्या सहयोगाने ‘सुरक्षित शाळा’ ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर तयार केली. शाळाक्षेत्रांत वाहनांची कमीत कमी ये-जा असेल आणि वर्दळमुक्त पदपथावरून शाळेत प्रवेश करता येईल अशाप्रकारे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुरक्षित वातावरण देणे हा या मागचा उद्देश होता. हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्याला शाळा समुहाने सकारात्मकतेने स्विकारल्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये या प्रकल्पाचा पुढे विस्तार केला जाईल. तसेच शाळेच्या ५०० मीटर पर्यंतचा परिघ हा विद्यार्थी आणि शालेय समुदायाकरिता चालण्यासाठी व शाळेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने सुरक्षित असेल याकरिता प्रयत्न केले जातील, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जाहीर केले.
टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत, मुंबई महानगरपालिका शाळांच्या आवारात तसेच सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकल्प राबविण्याचे महानगरपालिका प्रस्तावित आहे. कृती आराखड्यान्वये सार्वजनिक जागेचा विकास करण्याकरीता विविध नाविण्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करण्यात येत आहे. ज्यामुळे वाहतूक समस्या कमी होतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. यासाठी आगामी वर्षांमध्ये ५० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात गरीब, श्रीमंत वर्गाचे विभाजन)
शाळा परिसरांमध्ये काय काळजी घेतली जाईल
– विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करणे
– शाळेचे आवार आणि शाळेच्या आजुबाजूच्या परिसरातील उपयोगात नसलेल्या जागेचा सुयोग्य वापर करण्यासाठी योजना आखणे.
– आराखडयाचा अभ्यास आणि खेळ या घटकांचा समावेश करणे.
– शाळा आणि समाजात सकारात्मक संबंध प्रस्थापित करणे.
– विद्याथ्र्यांना चालणे व सायकलिंगसाठी प्रोत्साहित करणे.
– शाळेच्या आवारात आणि आवाराबाहेर पार्किंगसाठी जागेची व्यवस्था करणे.
– पादचाऱ्यांच्या सेवासुविधांमध्ये सुधारणा करणे.
– शाळेत येण्यासाठी सुरक्षित वातावरण