उद्यानांच्या देखभालीसाठी आधी निविदा रद्द, पुन्हा त्याच दरात नेमले कंत्राटदार

102
मुंबईतील मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक, तसेच वाहतूक बेटे आदी जागांच्या देखरेखीसाठी अखेर एक वर्षांकरता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येत आहे. यापूर्वी मागवण्यात आलेल्या निविदेचा कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ४० टक्क्यांपेक्षा कमी दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे काम योग्यरित्या होणार नाही, याची खात्री पटल्याने उद्यान विभागाने यासर्वाची निविदेसोबत भरलेली अनामत रक्कम जप्त केली होती. परंतु आता पुन्हा ही निविदा मगवल्यानंतरत उणे ३१ ते ४० टक्के दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आधीची निविदा ज्या हेतू साठी रद्द केली तो हेतू साध्य झालाच नाही. त्यामुळे त्याच प्रकारे बोली लावलेल्या कंत्राटदारांना कामे देण्याची शिफारस प्रशासनाने केली असून नक्की उद्यान विभागाने कुणाला कामे देण्यासाठी आधीची निविदा रद्द केली होती, असा सवाल उपस्थित होत आहे.

निविदा रद्द न करता कंत्राटदारांच्या नावाची शिफारस

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामधील उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने,  मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक/वाहतूक बेटे इत्यादी जागेच्या भूभागांचा विकास व देखरेख करण्याकरीता सन २०१९ मध्ये ई-निविदा मागवून विभागवार कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली याचा कालावधी ३१ मार्च २०२१ रोजी संपुष्टात आला. पण कोविड मुळे मुदतवाढ देण्यात आलेल्या या उद्यान देखभालीच्या कंत्राट कामाबत मागील सहा महिन्यांपूर्वी प्रथम निविदा मागवण्यात आली होती. पण यामध्ये उणे ४० टक्क्यांच्या आसपास व जास्त बोली लावल्याने ही निविदा रद्द करून, यांची अनामत रक्कम जप्त करत नव्याने निविदा प्रक्रिया राबवली. परंतु यामध्ये उणे ३१ ते ४० टक्क्यांपर्यंत कंत्राटदारांनी बोली लावत काम मिळवण्याचा प्रयत्न केला आणि प्रशासनने ही निविदा रद्द न करता त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

त्या-त्या विभागाकरिता प्रथम निविदाकार म्हणून शिफारस

यामध्ये  एका निविदाकाराला फक्त एकच काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे  सी व डी विभागाकरिता दुसऱ्या क्रमांकावरील निविदाकार मे. पिरामीड कंस्ट्रक्शन कं. यांना  (वजा ३६.८१%,), एफ/दक्षिण विभागाकरिता दुसऱ्या क्रमांकावरील निविदाकार कपूर ट्रेडिंग यांची (वजा ३८.५४%), पी/उत्तर विभागाकरिता दुसऱ्या क्रमांकावरील निविदाकार  गजानन कन्स्ट्रक्शन यांची (वजा ३९.८०%) व आर/दक्षिण विभागाकरिता दुसऱ्या क्रमांकावरील निविदाकार मीरा कंस्ट्रक्शन यांची (वजा ४०.०१% ) यांची त्या-त्या विभागाकरिता प्रथम निविदाकार म्हणून शिफारस केली आहे.

(हेही वाचा -रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले, कोरोना रुग्णांचा आकडा दोनलाख पार)

तसेच आर/उत्तर विभागाकरिता शाह एण्ड पारीख यांची (वजा ३१.७७%) व एम/ पूर्व विभागाकरिता बिलिव इन्फ्राप्रोजेक्ट यांची (वजा ३५.२०%) यांची फक्त एकच निविदा प्राप्त झाल्याने त्यांच्याही नावाची शिफारस केली आहे.  त्यामुळे ६५.७१ कोटी रुपयांचे कंत्राट काम असून सरासरी उणे ३७ टक्के दराने बोली लावून हे काम मिळवले आहे. त्यामुळे ही वादात अडकण्याची शक्यता आहे. कुणाला तरी लाभ देण्याचा उद्यान विभागाचे मनसुबे यातून स्पष्ट होत असून स्थायी समिती आता यावर काय निर्णय घेते की हे प्रस्ताव मंजूर उद्यान खात्यातील बजबजपुरीचे समर्थन करते हे येत्या समिती बैठकीत स्पष्ट होणार आहे.

विभाग निहाय नियुक्त करण्यात येणारी ही कंत्राटदारांची नावे

  • ए विभाग: एन. के. शाह इन्फ्राप्रोजेक्ट (वजा ३५.८८ टक्के)
  • बी विभाग: पीयुश इन्टरप्राईजेस (वजा ३७.५३ टक्के)
  • सी व डी विभाग : पिरामीड कंस्ट्रक्शन कं.( वजा ३६.८१ टक्के)
  • ई  विभाग:  पूष्पम इन्फ्राप्रोजेक्ट (वजा ३८.०१ टक्के)
  • एफ/दक्षिण विभाग: कपूर ट्रेडिंग ( वजा ३८.५४ टक्के)
  • एफ/उत्तर विभाग:   बालाजी इन्फ्राप्रोजेक्ट (वजा ३९.७० टक्के)
  • जी/दक्षिण विभाग: खुशबू इन्टरप्राईजेस (वजा ३२.६० टक्के)
  • जी/उत्तर  विभाग :  खुशबू इन्टरप्राईजेस (वजा ४०.५० टक्के)
  • एच/पूर्व विभाग : मावल कंस्ट्रक्शन (वजा ३९.९९ टक्के)
  • एच/पश्चिम विभाग : एच. व्ही. कंस्ट्रक्शन(वजा३७.०६ टक्के)
  • के/पूर्व विभाग :  विकाश इन्टरप्राईजेस( वजा ४१.१३ टक्के)
  • के/ पश्चिम विभाग : एरिक इन्फ्रास्टक्चर (वजा ४०.०१ टक्के)
  • पी/दक्षिण विभाग  : विरल असोशिएट(वजा ४०.५० टक्के)
  • पी/उत्तर विभाग : गजानन कंस्ट्रक्शन(वजा ३९.८०टक्के )
  • एलविभाग  : एएसके कंस्ट्रक्शन कं.(वजा ३९.८० टक्के)
  • एम पूर्व विभाग : विलिव इन्फ्राप्रोजेक्ट (वजा ३५.२० टक्के)
  • एम/पश्चिम विभाग : हर्षिल इन्टरप्राईजेस:(वजा ४०.०१ टक्के)
  • एन विभाग  : राठोड ब्रदर्स (वजा ३६.१८ टक्के)
  • एस विभाग :. टेन कंस्ट्रक्शन (आय) प्रा.लि.(वजा ३७.९९ टक्के)
  • टी विभाग : हिरावती इंटरप्रायजेस (वजा ३४.२० टक्के)
  • आर/दक्षिण विभाग : मीरा कंस्ट्रक्शन (वजा ४०.०१ टक्के)
  • आर/मध्य विभाग: वरुण कंस्ट्रक्शन (वजा ३८.७९ टक्के)
  • आर/उत्तर विभाग : शाह एण्ड पारीख (वजा ३१.७७ टक्के)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.