महिन्याला चर बुजवण्यासाठी मुंबई महापालिका खर्च करते ‘ इतके’ कोटी रुपये

162

मुंबईत विविध सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या चर बुजवण्याच्या कामांमधील घोटाळ्याचे आजवर आरोप होत असतानाच यासाठी नव्याने निविदा न काढता तीन महिन्यांसाठी पुन्हा विद्यमान कंत्राटदारांवरच जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला संपूर्ण मुंबईतील खोदलेले चर बुजवण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च केले जात असल्याची माहिती हाती आली आहे.

चर बुजवण्यासाठी कंत्राटदार

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह इतर खासगी संस्थांच्या माध्यमातून सेवा सुविधांचे जाळे टाकण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी खोदण्यात येणारे चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी सात याप्रमाणे स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक २०१९ मध्ये दोन ऐवजी स्थायी समितीच्या मंजुरीने तीन वर्षांकरता करण्यात आली आहे. हा कालावधी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेने ऑक्टोबर २०२१ रोजी निविदा मागवली होती. परंतु आजवर उणे ३० ते ४० टक्के कमी आल्याने निविदा रद्द करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या चर बुजवण्याच्या कामांच्या निविदा अधिक ६ टक्के ते उणे चार टक्के दराने आल्यानंतरही तांत्रिक कारण देत रद्द केल्या.

( हेही वाचा : आयुक्तांच्या आसपास घुटमळतोय कोरोना )

त्यामुळे वाढीव कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपल्याने येत्या फेब्रुवारी २०२२पर्यंत तीन महिन्यांकरता कंत्राट कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला. या तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये प्रत्येक परिमंडळांना वाढवून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राट कामांवर आतापर्यंत ३९६ कोटी ५८ लाख रुपये खर्च झाले आहे. त्यात आता २१ कोटी रुपयांची भर पडल्याने चर बुजवण्याचा मागील सव्वा तीन वर्षांतील कालावधीत ४१७ कोटी ५६ लाख रुपये एवढी एकूण कंत्राट रक्कम झाली आहे.

  • परिमंडळ १: हिरानी एंटरप्रायेझेस (मूळ कंत्राट – ६७ कोटी ४५ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ २: आर्मस्ट्राँग कन्स्ट्रक्शन (मूळ कंत्राट – ४५ कोटी ४६ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ ३: प्रगती एंटरप्रायझेस (मूळ कंत्राट – ६० कोटी ३७ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ ४: कोणार्क स्ट्रक्चरल (मूळ कंत्राट – ७० कोटी ९० लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ ५: लँडमार्क कार्पोरेशन (मूळ कंत्राट – ५९ कोटी ३५ लाख, वाढीव कंत्राट – ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ ६: वैभव एंटरप्रायझेस (मूळ कंत्राट – ३७ कोटी ५८ लाख, वाढीव कंत्राट- ३ कोटी रुपये)
  • परिमंडळ ७: बिटकॉन इं इन्फस्ट्रक्चर(मूळ कंत्राट – ४५ कोटी ४६ लाख, वाढीव कंत्राट – ३ कोटी रुपये)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.