कुर्ल्याचे दोन तुकडे!

148

मुंबईतील मालाड नंतर कुर्ला हा विभाग मोठा असून या विभागात १६ नगरसेवक असून या कुर्ला एल विभागाचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. सध्याच्या विद्यमान ‘एल’ विभागातील एकूण १६ प्रभागांचे विभाजन करून प्रस्तावित ‘एल/दक्षिण’ व ‘एल/उत्तर’ असे विभाग बनवले जाणार आहेत. यामध्ये एल दक्षिण विभागाचे कार्यालय विद्यमान जागेत आणि एल उत्तर विभागाचे कार्यालय चांदिवली येथील उप प्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव विशेष कक्ष, एम.सी.एम. सी. आर. या कार्यालयाच्या इमारतीत बनवण्यात येणार आहे.

‘एल’ विभागातील एकूण १६ प्रभागांचे विभाजन

मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांच्या नवीन रचनेनुसार ‘एल’ विभाग कार्यालयाचे विभाजन व पुनर्रचना करणेबाबत सहआयुक्त भारत मराठे व  सुनिल धामणे यांची द्विसदस्यीय समिती महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने स्थापन करण्यात आली आहे. या द्विसदस्यीय समितीने ‘एल’ विभागाचे विभाजन व पुनर्रचना करण्याबाबतचा तपशीलवार अहवाल सादर केला आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येनुसार मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांच्या बदलण्यात आलेल्या रचनेनुसार विभाग कार्यालयांचे विभाजन/पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. ‘एल’ विभागाची एकूण ८.९९,०४२ लोकसंख्या पाहता, विभागामध्ये कार्यरत यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय गतिमानतेसाठी “एल’ विभागाचे विभाजन करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.

(हेही वाचा – उच्च शिक्षित तरूणीला चोरीचा नाद! चोरीची स्टाईल वाचून तुम्हीही व्हाल थक्क!)

सध्या विद्यमान ‘एल’ विभागात १५६ ते १७१ असे एकूण १६ प्रभाग आहेत. सध्याच्या विद्यमान ‘एल’ विभागातील एकूण १६ प्रभागांचे विभाजन करून प्रस्तावित ‘एल/दक्षिण’ व ‘एल/उत्तर’ असे विभाग बनवण्यात येणार आहे. विद्यमान ‘एल’ विभागाची सध्या अस्तित्वात असलेली प्रभाग समिती प्रस्तावित ‘एल/दक्षिण विभागासाठी राहिल व ‘एल/उत्तर विभागाकरिता स्वतंत्र प्रभाग समिती निर्माण करण्यात येईल. तर ‘एल/उत्तर’ व ‘एल/दक्षिण’ विभागाचे प्रशासन उप आयुक्त (परि. ५) यांच्याकडे सोपविण्यात येईल.

रचनेनुसार अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करणे आवश्यक

एल विभागात उपलब्ध असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांची आवश्यकतेप्रमाणे प्रभागनिहाय उपलब्धतेनुसार त्यांचे विभाजन दोन विभागात करावयाचे झाल्यास ‘एल/उत्तर’ व ‘एल/दक्षिण’ विभागाकरिता विभागीय रचनेनुसार त्या त्या खात्याकरिता अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याकरिता नवीन पदे निर्माण करावी लागणार आहेत. एल’ विभाग कार्यालयाच्या विभाजन/पुनर्रचनेस महानगरपालिकेची मान्य मिळाल्यानंतर नवीन विभाग कार्यालयाची व्यवस्था करणे, नवीन विभाग कार्यालयासाठी फर्निचर व साधनसामुग्री उपलब्ध करणे, पदनिर्मिती करणे, पदे भरणे तथा अतिरिक्त कार्यभार देणे इत्यादी कामकाज संबंधित, सहायक आयुक्त व परिमंडळीय उप आयुक्त यांच्या मार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन केले जाईल.

‘एल / उत्तर’ विभागातील प्रभाग

  • १५६, १५७ १५८ १५९ १६० १६१, १६२. १६३ व १६४
  • (एकूण ९ प्रभाग)

 ‘एल/दक्षिण विभागातील  प्रभाग 

  • १६५, १६६ १६७ १६८, १६९ १७० व १७१
  • (एकूण ७ प्रभाग)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.