महापालिकेच्या शिक्षकांनी घेतले आदिवासी महिलांकडून हस्तकलेचे धडे

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग  मार्फत कार्यानुभव विषयाच्या शिक्षकांसाठी  सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या वतीने  एक दिवसीय अभ्यास वर्ग विरार वालिव येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तब्बल १५० शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. या अभ्यास वर्गात आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेपासून विविध गोष्टी बनवून दाखवल्या तसेच बांबू हस्तकलेचे विविध बारीक पैलू शिकवले .
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देणे तसेच त्यांना लघु उद्योगासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे. हाच मानस ठेवून  शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उपशिक्षणाधिकारी मध्यवर्ती सुजाता खरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव निर्देशिका तृप्ती पेडणेकर यांनी नियोजित क कार्यानुभव शिक्षकांसाठीची लघुउद्योग कार्यशाळा बुधवारी विरारच्या वालीव  येथेराष्ट्र सेवा समितीच्या सेवा विवेक ह्या बांबूच्या वस्तू तयार करणाऱ्या संस्थेत घेण्यात आली.
या कार्यशाळेत एकूण १५० शिक्षकांनी भाग घेतला होता.  तेथील  हस्तकला महिला कारागिरांनी बांबू पासून काही वस्तू बनविण्यास महापालिकेच्या शिक्षकांना शिकवले. या कार्यशाळेस शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ,उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे यानी उपस्थिती लावली. शिक्षण विभाग मार्फत आलेल्या कार्यानुभव च्या शिक्षकांनी सेवा विवेक च्या  बांबू हस्तकला कारागीर महिलांच्या कलेचे कौतुक केले तसेच अजून खूप कला शिकण्याची इच्छा बोलून दाखवली.
बांबू कामाच्या विविध वस्तू तयार करताना त्यापूर्वी करण्यात येणारे प्रक्रिया तसेच बांबूचे आकार कापणे याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच शिक्षकांनी त्याचे प्रात्यक्षिक करून विविध वस्तू तयार करण्याचा आनंद घेतला. सरते शेवटी कार्यानुभव शिक्षक प्रदीप पाटील आणि कुशल वर्तक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तसेच सेवा विवेक संस्थेच्या राजकुमारी गुप्ता, प्रगती भोईर व त्यांच्या संपूर्ण टीमला शिक्षणाधिकारी  राजेश कंकाळ  व उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे  ह्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन  करण्यात आले.
सेवा विवेक सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा या हेतूने    पुढाकार घेत आहे. या सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण  घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात नावलौकिक मिळवला आहे. दर्जेदारपणामुळेच या उत्पादनांनाचांगली मागणी आहे.
 या वर्षी  महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती.तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात, यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मिती वर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.
गेल्या वर्षी सेवा विवेक च्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले होते. माजी राष्ट्रपती यांनी हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कारही केला होता.आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत . या मुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here