मुंबईवर केंद्राचाच प्रकाश: एलईडीच्या पथदिव्यांचे ९५टक्के काम पूर्ण

145

केंद्र सरकारच्या निर्देशानंतर मुंबईतील सर्व सोडियम व्हेपरच्या पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये करण्याची मोहिम हाती घेतली. आतापर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांवरील पथदिवे ही एलईडीचे बसवण्यात आले आहेत. जवळपास ९५ टक्क्यांहून अधिक एलईडीचे दिवे बसवण्याचा हा प्रकल्प पूर्ण झाला असून केवळ साडेतीन हजार पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये रुपांतर होण्याचे काम शिल्लक आहे.

( हेही वाचा : पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना अटक )

केंद्रीय धोरणात्मक निर्णयानुसार, विद्युत ऊर्जा बचतीसाठीची योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील पथदिवे ही सोडियम व्हेपर ऐवजी एलईडीचे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. यासाठी एनर्जी ईफिशियन्सी सर्विस लिमिटेड यांना मुंबईतील दिवाबत्तीची खांबावर एल.ई.डी पथदिवे बसवण्याची परवानगी देण्यात आली होती.

सद्यस्थितीत हा प्रकल्प सुमारे ९५ टक्के पूर्ण झाला आहे. तसेच उर्वरीत काम हे विविध पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर असल्याने करता येत नाही,असे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होताच, उर्वरीत काम पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील शहर भागात अर्थात कुलाबा ते माहिम धारावी,शीव आदी भागात बेस्ट, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात गांधी नगर जंक्शन पर्यंत अदानी इलेक्ट्रीसिटी आणि पूर्व उपनगरात भांडुपमधील गांधी नगर जंक्शन ते मुलुंड चेकनाका आदी भागांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)आदींच्या माध्यमातून रस्त्यांवरील दिवाबत्तीची व्यवस्था केली जाते. भाडेतत्वावरील देखभालीच्या व्यवस्थेचा खर्च महापालिकेच्यावतीने संबंधित वीज वितरण संस्थांना दिला जातो.

एकूण रस्त्यांवरील पथदिव्यांची संख्या

  • मुंबई शहर (बेस्ट हद्द) : ४२,४२१(एलईडीत रुपांतर : ४०,७८४)
  • उपनगरे (अदानी इलेक्ट्रीसिटी) : ८७,३४७ (एलईडीत रुपांतर : ८४,४७०)
  • महावितरण (भांडुप ते मुलुंड) : ११,३७७ (एलईडीत रुपांतर : ११,१२५)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.