महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड असणार आहे. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय यंदा महापालिकेच्या पार पडणार आहेत. त्यातच महापालिकेच्या वॉर्डांची संख्या वाढल्याने राजकीय पक्ष ओबीसींना कसी प्रकारे आणि किती राजकीय प्रतिनीधीत्व देतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपने यापूर्वी २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व व्याप्ती निश्चित केल्या संदर्भात प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून मदान यांनी सूचना केल्या आहेत. यानुसार प्रभाग रचना ठरवण्यात येणार आहे.
वाढीव ९ वॉर्डपैकी ६ वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेत खालीलप्रमाणे आरक्षण असेल
आरक्षण
- खुला प्रवर्ग – २१९
- एससी – १५
- एसटी – २
महिला जागा
- खुला प्रवर्ग – ११८
- एससी – ८
- एसटी – १
या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित
नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या 14 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास सरकारने असहमती दर्शवली होती. यासंदर्भात विधिमंडळात कायदाही मंजूर करण्यात आला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community