दुकानाच्या पाट्या मराठीत न केल्यास पुढील आठ दिवसात कायदेशीर कारवाई

195

मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी मंगळवार ३१ मे २०२२पर्यंत मुदत देण्यात आली होती. या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी येत्या ८ ते १० दिवसात सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : परिचारिकांच्या बेमुदत संपावर काय म्हणाले वैद्यकीय शिक्षणमंत्री…)

…तर पुढील आठ दिवसात कायदेशीर कारवाई

मुंबईत मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने येत्या ८ ते १० दिवसात मराठी नामफलकाबाबतच्या पूर्ततेची दुकाने व आस्थापना खात्याकडून सर्वेक्षण करून आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर आढाव्याच्या अनुषंगाने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम २०२२ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकारी (दुकाने व आस्थापना) सुनीता जोशी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.