मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट पूर्ण, आता तिजोरीत जमा होणार बोनस

127

मागील वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत ५६० कोटी रुपयांचा महसूल करणाऱ्या करनिर्धारण व संकलन विभागाने ३१ मार्च २०२१रोजी पर्यंत ५ हजार १३५ पूर्णांक ४३ कोटी रुपयांचा महसूल वसूल करत इतिहास रचला होता. परंतु यंदा निश्चित लक्ष्यापेक्षाही अधिक महसूल वसूल करण्यात महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले होते, परंतु मार्च २०२२पर्यंम महापालिकेच्या निश्चित केलेल्या टार्गेटपेक्षा १०० कोटी रुपये अधिक महसूल वसूल केला. २९ मार्च २०२२ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ५१८१.५० कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

( हेही वाचा : पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८० पंप; वर्षाला सुमारे ४६ कोटींचा खर्च )

कर वसुलीचे लक्ष्य गाठले

मुंबई महापालिकेने सन २०२१-२२ या वर्षांकरता सुमारे ५१०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. त्यातुलने २९ मार्च २०२२पर्यंत महापलिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे ५१८१.५० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. तर याच कालावधीत मागील वर्षी ४५३६.८१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या नेतृत्वाखाली कर वसुलीचे लक्ष्य गाठले आहे.

मागील २९ दिवसांमध्येच या विभागाने ७७८.०४ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. तर २९ मार्च २०२२च्या दिवशी ७६.७५ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. अजून दोन दिवस शिल्लक असून त्यापूर्वीच निश्चित केलेल्या कर आकारणीच्या लक्ष्यापेक्षा १०० कोटी रुपये वसूल केले असून पुढील दोन दिवसांमध्ये वसूल होणारी कराची रक्कम ही महापालिकेच्या तिजोरीतील बोनस ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.