टाऊन वेंडिंग समिती सदस्य: फेरीवाले निवडून देणार आपले प्रतिनिधी

167

मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबात शहर विक्रेता समितीमध्ये (टाऊन वेंडींग समिती) अन्य सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये फेरीवाल्यांमधून मतदानाद्वारे संघटनांच्या प्रतिनिधींची निवड केली जाणार असून याबाबत सर्वेमध्ये अर्ज पात्र झालेल्या आणि अधिवास प्रमाणपत्र असलेल्या फेरीवाल्यांची यादी महापालिकेच्या माध्यमातून कामगार आयुक्तांना पाठवली आहे. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या फेरीवाल्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश शहर विक्रेता समितीमध्ये तसेच परिमंडळ विक्रेता समितीमध्ये सदस्यपदी केली जाणार आहे.

(हेही वाचा – “प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी..” फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची कोंडी?)

केंद्र सरकारने पदपथ विक्रेते (उपजिविका संरक्षण आणि पदपथावरील विक्रीचे विनियमन) अधिनियम-२०१७ हा कायदा मंजूर केला आहे आहे. त्यानुसार सर्व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्राची अंमलबजावणी करणे आवश्यक आहेत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेस तिच्या लोकसंख्येनुसार २.५ टक्के इतक्या फेरीवाल्यांना विक्रीकरता निर्देश दिल्याचे दिल्याचा दावा फेरीवाला संघटनांकडून केला जात आहे. मात्र, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीकोनातून शहर विक्रेता समिती व परिमंडळ विक्रेता समित्या गठीत करण्यात आल्या असून त्यामध्ये फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींची निवड मतदान प्रक्रियेद्वारे करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने सर्वेमधील अर्ज केलेल्या आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे अशा फेरीवाल्यांची मतदार यादी तयार करून कामगार आयुक्तांकडे निवडणुकी प्रक्रियेसाठी पाठवून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये फेरीवाला समितीमध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी ही या निवडणुकीत निवडून येणारेच असतील. फेरीवाल्यांमधून निवडून येणाऱ्या प्रतिनिधीलाच समितीचे सदस्य म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे फेरीवाला समितीमध्ये इतर सदस्यांची निवड झाली असली तरी फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीची निवड होणे आवश्यक असल्याने फेरीवाल्यांची मतदार यादी महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधींची फेरीवाला समितीवर सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. लवकरच ही निवडणूक त्यांच्या स्तरावर पार पाडली जाणार असून महापालिकेने फेरीवाल्यांची मतदार यादी तयार केली असून ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल ते फेरीवाले या मतदानात भाग घेऊ शकतात,असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांना अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे मतदानाचा अधिकार दिला जाणार असला तरी याचा अर्थ ते पात्र आहेत असा होत नाही. त्यांना मतदानासाठीच या अधिवास प्रमाणपत्राच्या आधार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.