संशयित गोवरबाधित मृत्यूबाबत BMC चं स्पष्टीकरण, मृत्यूचं कारण आलं समोर

123

गोवंडीतील ८ महिन्यांच्या बाळाचा २४ नोव्हेबंर रोजी मृत्यू झाला होता. हा गोवरचा संशयित मृत्यू असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली होती. अखेरिस या बाळाचा मृत्यू गोवरननंतर होणा-या इतर आजाराच्या गुंतागुंतीमुळे झाल्याचे मृत्यू अहवाल समितीने स्पष्ट केले आहे. गोवरबाधित या मुलाच्या मृत्यूमागे न्यूमोनिया कारणीभूत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

बाळाबद्दल माहिती

२० नोव्हेंबरला गोवंडीत राहणा-या आठ महिन्यांच्या बाळाला ताप आणि पुरळ येत असल्याने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी बाळाची तब्येत खालावल्याने त्याला पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र २४ तारखेला बाळाचा दुपारी १ वाजून १० मिनिटांनी मृत्यू झाला. मृत्यूच्यावेळी त्याच्या शरीरातील अवयव निकामी होत गेल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले. गोवरसह त्याला न्यूमोनियाही झाला होता, असेही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.

(हेही वाचा – गोवरचं थैमान! राज्यात शंभरहून अधिक ठिकाणी उद्रेक, संसर्ग पसरण्याची भीती)

बालरोगतज्ज्ञ डॉ मुकेश अग्रवाल यांच्या माहितीनुसार, गोवरच्या रुग्णांमध्ये गुंतागुत गोवरची तीव्रता कमी झाल्यानंतर दिसून येते. पहिल्या आठवड्यात रुग्णांना पुरळ आणि ताप दिसून येतो. आठवड्याभरानंतर त्यांना श्वसनाचा न्यूमोनिया होतो. या न्यूमोनियामुळेच ९० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने लक्षणे दिसून आल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करा, असे आवाहन ड़ॉ अग्रवाल यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.