घरातील धोकादायक कचऱ्यावर प्रक्रिया : आठ ठिकाणी विल्हेवाट केंद्र

156

मुंबईत घरातील ओला व सुका कचऱ्याबरोबरच आता घरातील धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. या घरातील धोकादायक कचऱ्यावर विल्हेवाट लावण्यासाठी प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने आठ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, मास्कसह इतर वस्तूंची विल्हेवाट लावली जाणार आहे.

मुंबईत दरदिवशी सुमारे ६८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे ५००० मेट्रिक टन कचर्‍यावर कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्तपणे प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येतात. तर देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पारंपारिकपध्दतीने १८०० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येतात. मात्र एकूण कचर्‍यापैंकी नागरी कचर्‍यात असलेल्या अविघटनशील, रासायनिक किंवा जैविकरित्या अपायकारक नसलेल्या व ज्याचे पुनर्चक्रीकरण करता येणे शक्य नाही, अशा घटकांची शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया करताना १० टक्केच कचर्‍यावर प्रक्रीया करता येते.

( हेही वाचा : महापालिका निवडणूक भाजप मिशन: महापालिका १३४, भाजप १३४ प्लस )

प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत सुका कचरा, ओला कचरा आणि घरगुती धोकादायक कचरा असे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्यामुळे घरगुती धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारीत ४ टीपीडी क्षमतेचे आठ घनकचरा प्रक्रिया यंत्राचा पुरवठा ,उभारणी, चाचणी व कार्यान्वयन आणि एक वर्षांकरता देखभाल अशाप्रकारचा मागवलेल्या निविदेमध्ये एचईसी एन्वायरो इंडिया ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीला आठ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी २४ कोटी ७७ लाख २८ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घरात अनेक धोकदायक कचरा निर्माण होतो. या धोकादायक कचऱ्यामध्ये मास्क, सॅनिटनी नॅपकिन,तसेच इतर वस्तूंची विल्हेवाट लावली जाणार आहे. हा धोकादायक कचरा बंदिस्त करून वेगळा ठेवल्यास ते गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे,असे त्यांनी सांगितले.

प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय

मुंबई अविघटनशीर कचर्‍यांची विल्हेवाट लावणे शक्य असल्याने महापालिकेने ४ मेट्रिक टनाच्या एकूण ३ प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. आहे. या प्रक्रीया केंद्रासाठी विल्हेवाटी संचाचा पुरवठा करण्यासह एक वर्षांच्या देखभालीसाठी प्रायोगिक तत्वावर शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारीत यंत्रणाची उभारणी करण्यासाठी हिंदुस्थान इंजिनिअरींग कंपनीची निवड करून एकूण ६ कोटी ८६ लाख रुपयांच्या कंत्राटाला दोन वर्षांपूर्वी मान्यता देण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.