बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याने येथील प्रत्येक विभागाचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली जात आहे. मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील बॅटमिंटन कोर्टची जागा कंत्राटदाराने स्वत: खर्चाने विकसीत करून सात वर्षांकरता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाला ९५ लाखांचे भाडे आणि २५ लाखांचे डिपॉझिट एवढे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठानच्यावतीने जागेचा कमर्शियल वापर केला जात असल्याने याठिकाणी प्रतिष्ठानला भावी खेळाडू घडवायचे की पैसे कमवण्यासाठी या जागेचे व्यावसायीकरण करायचे आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : मुंबईवर केंद्राचाच प्रकाश: एलईडीच्या पथदिव्यांचे ९५टक्के काम पूर्ण )
चौकशीची मागणी
अंधेरी आणि मुलुंडमधील दोन्ही क्रीडा संकुलांमध्ये होणाऱ्या विविध सुविधांमार्फत जमा झालेले उत्पन्न व संकुलाच्या व कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत आणि भविष्यात येणाऱ्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ठेवलेली अनेक राष्ट्रीयकृत बँकेतील मुदत ठेवीतील रक्कम खर्च झाली, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.
प्रतिष्ठानला दिलेल्या वास्तू दिवाळखोरीच्या वाटेवर असतानाच मुलुंडमधील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जागा बॅटमिंटन हॉल जागा कंत्राटदारो स्व:खर्चाने विकसित करून येथील ४ बॅटमिंटन कोर्ट येथे बॅटमिंटन आणि इतर इनडोअर खेळ, प्रशिक्षण, स्पर्धा, विविध आरक्षण तसेच फिल्म शुटींग सुविधा शुल्क स्वीकारण्याबाबत जाहिर निविदा मागवण्यात आली आहे.
( हेही वाचा : कांदिवलीतील लालजीपाडा, जनता कॉलनी, एकता नगरमधील पूरपरिस्थिती होणार दूर! )
या निविदांमध्ये भाग घेणाऱ्या कंत्राटदार संस्थांना किमान वार्षिक ९५ लाख रुपयांचे शुल्क निश्चित केले. त्यामुळे यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्या संस्थेची निवड केली जाणार आहे. मात्र, या निविदेमध्ये २५लाख रुपयी अनामत रक्कम आकारली जाणार असून तीन वर्षांचे भाडे आगावू स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे किमान दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेलाच हे काम मिळवता येणार आहे.
माफक दरात सुविधा प्राप्त व्हाव्यात म्हणून या प्रतिष्ठानची स्थापना
मुलुंडमधील बॅटमिंटन कोर्टमध्ये सध्या दोन ते अडीच हजार रुपये शुल्क आकारले जाते. परंतु जर कोट्यवधी रुपयांचा बोलीवर बॅटमिंटन कोर्टची जागा दिल्यास बॅटमिंटन खेळाच्या खेळाडूंना प्रशिक्षण घेण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये मासिक शल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेण्यासाठी एवढे रुपये मोजावे लागले तरी सर्वसामान्य खेळाडू कसा प्रशिक्षण घेऊ शकेल असाही प्रश्न निर्माण होत आहे.
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य मुंबईकराला रास्त आणि माफक दरात सुविधा प्राप्त व्हाव्यात म्हणून या प्रतिष्ठानची स्थापना केली होती. परंतु सर्वसामान्य मुंबईकराऐवजी आता प्रतिष्ठान धनदांडग्यांच्या घशात या येथील जागा घालून त्या जागेचे व्यावसायीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मुलुंड येथील बॅटमिंटन कोर्टमध्ये सध्या प्रशिक्षण वर्ग सुरु असून अंधेरीतील क्रीडा संकुलात बॅटमिंटन कोर्ट हे बंदस्थितीत आहेत. त्यामुळे या बंद जागेतील बॅटमिंटन कोर्ट पुन्हा सुरु करण्यासाठी अशाप्रकारच्या संस्थेची निवड करणे आवश्यक असताना प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन यांचे लक्ष केवळ मुलुंडच्या जागेवर असल्याने शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी मुलुंडमधील याठिकाणी मराठी कॅटरर्स कंपनीला हद्दपार करत अमराठी कॅटरर्सला प्रवेश दिल्यानंतर आता ठिकाणी काही अमराठी कंत्राटदार तथा संस्थेला प्रवेश देण्यासाठी जैन यांचा प्रयत्न आहे का असा सवाल येथील कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात जैन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
Join Our WhatsApp Community