मुंबईच्या मालमत्ता कर वसुलीवर निवडणुकीचे सावट, तरीही…

149

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता असून त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक विभागाची धुरा पाहणाऱ्या कर निर्धारण व संकलन विभागावरच मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी आहेत. त्यामुळे ज्या फेब्रुवारी व मार्चमध्ये सर्वाधिक मालमत्ता कर वसूल केला जातो, त्याच कालावधीत निवडणुकीच्या कामाला वेग येणार असल्याने मालमत्ता विभागाने मागील जानेवारीच्या तुलनेत यंदा अधिकची वसूली करत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच ३१ मार्चचे टार्गेट फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवत महापालिकेचे अधिकारी कामाला लागले आहेत.

( हेही वाचा : वांद्र्यात ‘त्या’ जागेवर कर्करोग रुग्णालय बांधण्याची भाजपची मागणी )

निवडणुकीच्या अतिरिक्त ताणामुळे कराच्या वसुलीचे मोठे आव्हान

मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची वसुली कर निर्धारण व संकलन विभागाच्या माध्यमातून वसूल केली जात असून आगामी निवडणुकीच्या अतिरिक्त ताणामुळे या कराची वसुलीचे मोठे आव्हान या विभागापुढे आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उर्वरीत महसूल वसुलीवर होणारा परिणाम लक्षात घेता या विभागाचे प्रमुख अधिकारी विश्वास मोटे यांनी पुढाकार घेत सहआयुक्त सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाची नोव्हेंबर महिन्यातच बैठक घेत वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये सर्वाधिक वसुली करण्याचे टार्गेट २४ विभागातील करनिर्धारण व संकलन अधिकाऱ्यांना दिले होते.

( हेही वाचा : शिवसेना-भाजपची युती व्हावी असं महाविकास आघाडीतील ‘या’ मोठ्या पक्षाला वाटतं )

त्यानुसार एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत आतापर्यंत ३८४७.५१ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. तर मागील वर्षी याच कालवधीमध्ये १४०४.२१ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या लक्ष्य गाठवण्यासाठी अजून २४४३ कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आजवर वसूल झालेल्या महसूलाची टक्केवारी अपेक्षित महसुलाच्या तुलनेत १७४ टक्के एवढी आहे. तर १ ते ३० जानेवारी या कालावधीमध्ये आतापर्यंत ३७१.७८ कोटी रुपये एवढा महसूल एका महिन्यात वसूल करण्यात आला आहे. एका बाजुला निवडणुकीची जबाबदारी आणि दुसरीकडे मालमत्ता वसुलीची जबाबदारी करनिर्धारण व संकलन विभागातील प्रत्येक कामगार हिरीरीने पार पाडताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली असती तर घटणारा महसूल लांबणीवर पडलेल्या परंतु प्रक्रियेला सुरुवात झालेली असतानाही कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम वसूल करण्यावर भर दिला आहे. करनिर्धारण व संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी विश्वास मोटे यांच्यावर एम पश्चिम विभागाची अतिरिक्त जबाबदारी असतानाही त्यांनी आपल्या विभागाचे लक्ष की होऊ दिले नाही. त्यामुळे महापालिकेत जानेवारी महिन्यामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक महसूल जमा झालेला दिसत आहे.

मागील दोन वर्षांमध्ये वसूल झालेला मालमत्ता कर

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च, २०२० या कालावधीत ४,१६१ कोटी रुपये

१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत ५,१३५.४३ कोटी रुपये

२ एप्रिल २०२१ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत ३८४७.५१ कोटी रुपये

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.