मुंबईतील पवई चांदिवली भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असून संघर्ष नगरमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत याठिकाणी महापालिकेच्यावतीने रुग्णालय उभारले जाणार आहे. चांदिवली संघर्ष नगरमध्ये बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाच्या दृष्टीकोनातून वास्तूशास्त्रीय सल्लागार आणि आरोग्य सल्लागार संस्थांची नेमणूक करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या एकूण बांधकामासाठी सुमारे ३२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
चांदिवलीत रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा निर्णय
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चार प्रमुख रुग्णालये, १७ उपनगरीय रुग्णालये तसेच विशेष रुग्णालये अस्तित्वात असून पूर्व उपनगरांमध्ये रुग्णालयांची संख्या कमी असल्याने त्याठिकाणी रुग्णालयांची उभारणी केली जात आहे. भांडुप-नाहुरमध्ये प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जात असतानाच आता चांदिवली संघर्ष नगरमध्ये रुग्णालय उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेने सल्लागार संस्थाची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवला आहे.
(हेही वाचा – मुंबईतील मंजूर शौचालयांमधील ३,२१८ शौचकुपांची कामे गुंडाळली!)
रुग्णालयाच्या बांधकामासाठी ३२२ कोटी खर्च अपेक्षित
रुग्णालयाच्या उभारणीकरता आरोग्य तज्ज्ञ, एच.व्ही.ए.सी तज्ज्ञ, एम.ई तज्ज्ञ, मेडिकल गॅस तज्ज्ञ व इतर संबंधित तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे ज्या वास्तूशास्त्रीय तज्ज्ञांकडे सर्व तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून हे काम महापालिका करुन घेणार आहे. यासाठी सल्लागार संस्थांकडून मागवलेल्या स्वारस्य अर्जांमध्ये ६ संस्थांनी अर्ज दाखल केले. यामध्ये दत्ता अँड दत्ता असोशिएट्स-प्रविण नाईक अँड असोशिएट्स-हॉरुग्णालयाच्या बांधकामासाठी ३२२ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षितस्मेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या संयुक्त संस्थेला ८९ गुण प्राप्त झाले आहेत. त्या या संस्थेची सल्लागार म्हणून शिफारस करण्यात आली आहे. या असलयाने या सल्लागार कंपनीला एकूण बांधकाम किंमतीच्या १.८७ टक्के अर्थात एकूण सल्लागार शुल्क म्हणून ६ कोटी २ लाख १४ हजार रुपये दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community