‘सांताक्लॉज’ यंदा वृक्षरुपात मुंबईत अवतरणार

86

वांद्रे पश्चिम परिसरातील संगीत सम्राट नौशाद अली मार्गावर (कार्टर रोड) असणाऱ्या एका वृक्षावर लहान थोरांची लाडकी असणारी सांताक्लॉजची लाल-लाल रंगाची गोंडेदार, पण भव्य-दिव्य टोपी अवतीर्ण होणार आहे. येत्या ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने व गोदरेज कंपनीच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

वृक्षाला प्रातिनिधिक स्वरूपात सांताक्लॉजचे रुपडे देणार

अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका तान्या दुभाष आणि मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. एच पश्चिम विभागातील (वांद्रे पश्चिम) संगीत सम्राट नौशाद अली मार्गालगत (कार्टर रोड) व ‘कॉफी बाय दी बेल्ला’ च्या समोर असणा-या एका वृक्षाला प्रातिनिधिक स्वरूपात सांताक्लॉजचे रुपडे दिले जाणार आहे.

(हेही वाचा ओबीसी आरक्षणाशिवाय १०५ जिल्हा परिषदांच्या जागांवर मतदान सुरू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.