- ऋजुता लुकतुके
प्रिमिअम गाड्या आता भारतीय बाजारपेठेसाठीही अप्रूपाची गोष्ट नाहीत. बीएमडब्ल्यू, मर्सिडिझ, ऑडी या सगळ्या गाड्या जागतिक बाजारपेठेत येतात त्याच वेळी भारतातही येतात. आताही बीएमडब्ल्यू ५ सीरिज (BMW 5 Series 2024) लाँच करताना बीएमडब्ल्यू कंपनीने ती भारतात आणण्याची तयारीही सुरू केली आहे. बीएमडब्ल्यू ५ आणि बीएमडब्ल्यू आय५ अशा दोन गाड्या सध्या लाँचच्या तयारीत आहेत. युरोपीयन बाजारात त्यांना चांगली पसंतीही मिळत आहे. (BMW 5 Series 2024)
गाडीचं इंजिन २ लीटर टर्बोचार्ज हायब्रिड इंजिन आहे. आणि यातून २५५ अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण होते. ० ते ६० मैलांचा वेग ही गाडी ५.८ सेकंदात गाठू शकते. गाडीचं इंटिरिअरही आधुनिक आहे. आणि टचस्क्रिन डिस्प्ले १४ इंच इतका मोठा आहे. (BMW 5 Series 2024)
(हेही वाचा- Indias Chief Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी लक्ष्मण यांचं नाव आघाडीवर, लँगर आणि गंभीर यांच्या नावाचीही चर्चा )
आता ५ सीरिजची भारतातील किंमतही कंपनीने उघड केली आहे. गाडीची किंमत ६५.३८ लाख रुपयांपासून सुरू होते. तर गाडीचा सगळ्यात महागडं मॉडेल ७४.४९ लाखांचं आहे. (BMW 5 Series 2024)
Bas itna paisa chahiye ki y kisi ko gift kar saku.
BMW 5 Series 530i xDrive pic.twitter.com/lGXGtvBBHA
— Reetiya (@reetiya09) April 23, 2024
आधुनिक तंत्रज्जान हा तर बीएमडब्ल्यूचा पाया आहे. आणि सीरिज ५ मध्ये तुम्हाला तो अनुभवता येतो. ‘हे बीएमडब्ल्यू,’ असं उच्चारल्यावर तुम्हाला आवाजाने नियंत्रित होईल अशी मदत मिळते. अगदी थंडी वाजतेय म्हटल्यावर गाडीतील तापमानही ही यंत्रणा नियंत्रित करते. त्याचबरोबर चालकासाठी आहे अशीच यंत्रणा, जी ताशी १३० किमी वेगाने जात असतानाही तुम्हाला स्टिअरिंग व्हील सोडलं तरी गाडी नीट चालवायला मदत करते. (BMW 5 Series 2024)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: …तर मथुरा आणि काशीमध्येही बांधली जातील भव्य मंदिरे, आसामच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन)
चालकाने मार्गिका बदलली तर ही यंत्रणा लगेच तसा इशारा देते. आणि ही यंत्रणा बसवणारी बीएमडब्ल्यू ही पहिली कंपनी होती. गाडीच्या एक्सटिरिअरला कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय चालकाच्या सीटमधून दिसणारं दृष्यही स्पष्ट आहे. त्यामुळे गाडीच्या अवती भवती काय घडतंय हे चालकाला लगेच आणि ठळकपणे दिसू शकतं. (BMW 5 Series 2024)
अशी ही अत्याधुनिक गाडी ७० लाखांपासून सुरू होणार आहे. आणि गाडीच्या आय५ या इलेक्ट्रिक वाहनाविषयी अजून कुठलीही स्पष्टता नाही. (BMW 5 Series 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community