गुजरातमधील सारिगाम GIDC तील कंपनीत बॉयलरचा स्फोट; स्फोटामुळे इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कारखान्यात सोमवारी रात्री भीषण स्फोट झाला. सारिगाम GIDC वेन पेट्रोकेम अॅंड फार्मा प्रायव्हेट या कंपनीतील बाॅयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला भीषण आग लागली. शिवाय बाॅयलरच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की तीन मजली कंपनी कोसळली. कंपनीची तीन मजली इमारत कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी लोक दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरु केले. दरम्यान, भिलाड पोलिसांच्या ताफ्यानेही घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य सुरु केले.

( हेही वाचा: मराठी भाषेत आपल्या अस्तित्वाचा सुगंध: साहित्यिक सदानंद मोरे )

स्फोटाचे कारण अस्पष्ट 

पालघर जिल्ह्याजवळच्या वलसाड तालुक्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कंपनीत रात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कंपनीत बाॅयलरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. पहाटे चार वाजेपर्यंत ढिगा-याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here