मॅर्लिन मनरो (Marilyn Monroe) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल होती. ती विशेषतः कॉमिक ब्लॉन्ड पात्रे साकारण्यासाठी ओळखली जायची. ती १९५० ते १९६० च्या सुरुवातीच्या दशकापर्यंत सर्वांत बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. मॅर्लिन त्या काळातली प्रचंड बोल्ड आणि महागडी अभिनेत्री होती. तिच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत तिने सुमारे दोन बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी कमाई केली होती. १९९९ साली अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने मॅर्लिन हिला हॉलिवूडच्या सुवर्णकाळातल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सहावं स्थान दिलं आहे. (Marilyn Monroe)
मॅर्लिन मनरोचा (Marilyn Monroe) जन्म १ जून १९२६ साली लॉस अँजेल्स येथे झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिचं बालपण वेगवेगळ्या बारा पाळणाघरांमध्ये आणि नंतर एक अनाथाश्रमामध्ये गेलं. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने जेम्स डॉगर्टी नावाच्या माणसाशी लग्न केलं. (Marilyn Monroe)
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : दोघांचे प्राण घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार)
दुसरं महायुद्ध सुरू असताना ती फर्स्ट मोशन पिक्चरच्या युनिटमधल्या एका फोटोग्राफरला भेटली. त्यानंतर तिने आपल्या मॉडेलिंग कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यात ती यशस्वीही झाली. मॉडेलिंग करत असतानाच ती एका कंपनीतही काम करत होती. म्हणून २०th सेंच्युरी फॉक्स आणि कोलंबिया पिक्चर्स या कंपन्यांसोबत तिने कमी कालावधीसाठी चित्रपटांचे करार केले होते. (Marilyn Monroe)
एकामागोमाग एक अशा छोट्या भूमिका केल्यानंतर मॅर्लिनने (Marilyn Monroe) १९५० सालच्या उत्तरार्धात फॉक्स कंपनीशी एक नवा करार केला. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत ती एक विनोदी भूमिका साकारणारी बोल्ड आणि प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. चित्रपटांत येण्यापूर्वी मॅर्लिनला न्यूड फोटोग्राफिसाठी तिने दिलेल्या पोझमुळे सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याचा तिच्या कारकीर्दीवर काहीही फरक पडला नाही. (Marilyn Monroe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community