प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. आता त्यांच्या निधनाने बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर कोणालातरी भेटण्यासाठी गेले होते. फार्म हाऊसवरुन परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये ह्रदविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते.

( हेही वाचा: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात; एकाच घरातील 4 जण ठार )

अनुपम खेर यांचे ट्वीट

अनुपम खेर यांचे ट्वीट मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे. हे माहिती आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती, असे ट्वीट करत अनुपम खेर सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here