बॉलिवूडमध्ये पुन्हा खळबळ: आयकर विभागाची अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घरावर धाड 

वादग्रस्त पार्श्वभूमी असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

सध्या केंद्रीय यंत्रणा बॉलिवूडमधील एक एक प्रकरणे बाहेर काढत आहेत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणात बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन समोर आल्यावर एनसीबीने मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली. आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली असून प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचा घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

२०१५सालच्या आर्थिक व्यवहारावरून कारवाई!

२०१५साली फँटम या चित्रपटासंबंधी झालेल्या आर्थिक व्यवहारावरून ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहल या तिघांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या कलाकारांवर इन्कम टॅक्स चोरीचे मोठे आरोप असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा : फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार!)

अनुराग कश्यप यांची वादग्रस्त पार्श्वभूमी! 

  • दिग्दर्शक अनुराग कश्यप हे जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. ही टीकाही अत्यंत जहरी असते.
  •  ‘मी टू’ या मोहिमेच्या अंतर्गत जेव्हा बॉलिवूडमधील महिला अत्याचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली, तेव्हा अभिनेत्री पायल घोष हिनेही कश्यप यांच्यावर त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला.
  • त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली होती.
  • कंगणा जेव्हा जेव्हा केंद्र सरकारच्या बाजूने सोशल मीडियातून मतप्रदर्शन करतात, तेव्हा कश्यप त्यांचा प्रतिवाद करत ट्विटरवॉर करतात.

तापसी पन्नू आणि कंगना यांच्यात वाद 

कंगनाने अनुराग कश्यप यांना महिला कलाकारांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात यावी, अशी मागणी केल्यावर कश्यप यांच्या बाजूने काही अभिनेत्री उभ्या राहिल्या. त्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू ही देखील होती. त्यांनतर तापसी पन्नू आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावरून ट्विटर वॉर सुरु झाले. अनुराग कश्यप आणि तपासू पन्नू हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्वतः तापसी पन्नूने सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here