अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात!

अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर हा बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी समोर आली आहे. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला अटक केली आहे. बंगळुरुतील एका ड्रग्ज पार्टीत सिद्धांत कपूरची उपस्थिती होती. सिद्धांत कपूरने ड्रग्जचे सेवन केल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर समोर आले आहे. 5 स्टार हाॅटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरु होती.

रविवारी रात्री बंगळुरुमध्ये झालेल्या एका पार्टीत सिद्धांत कपूरने ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हाॅटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हाॅटलेवर छापा टाकला. ड्रग्जचे सेवन केले की नाही, हे तपासण्यासाठी तिथल्या काही जणांची चाचणी करण्यात आली. यावेळी इतर सहा जणांसोबत श्रद्धा कपूरच्या भावाचाही रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला.

( हेही वाचा: पालक वर्गासाठी महत्त्वाची बातमी; स्कूल बसचा प्रवास 20 टक्क्यांनी महागला )

याआधी श्रद्धा कपूरचेही नाव आलंय समोर 

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना, बाॅलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावे उघड झाली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग, दिपीका पदुकोण, सारा अली खान या अभिनेत्रींचीही एनसीबीमार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here