नमाजाच्या वेळी मशिदीत बॉम्बस्फोट, ‘इतके’ लोक जागीच ठार

107

पाकिस्तानातील वायव्येकडील पेशावर शहरातील मशिदीमध्ये शुक्रवारी नमाजाच्या वेळी  बॉम्बस्फोट झाला आणि या बाॅम्बस्फोटात किमान 30 जण ठार तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. किस्सा ख्वानी बाजार परिसरात असलेल्या जामिया मशिदीत लोक शुक्रवारची नमाज अदा करत असताना, हा स्फोट झाल्याचे एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले.

10 जखमींची प्रकृती चिंताजनक

10 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कोचा रिसालदार भागातील आहे. या अपघातात एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. लेडी रीडिंग रुग्णालयाच्या मीडिया मॅनेजरने सांगितले की, आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

(हेही वाचा – अनिल परबांचं पुन्हा एकदा संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन! म्हणाले…)

बुधवारीही झाला स्फोट

याआधी बुधवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे पोलीस व्हॅनजवळ स्फोट झाला होता. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाले आहेत.

जिना रोडवर स्फोट 

क्वेट्टा येथील फातिमा जिना रोडवर हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात दोन ते अडीच किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. ऑपरेशनचे उपमहानिरीक्षक, फिदा हुसेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनची पोलीस मोबाइल व्हॅन परिसरात होती, तेव्हा मोठा स्फोट झाला. हा स्फोट कसा झाला हे माहीत नाही, पण स्फोटामुळे खूप नुकसान झाले आहे. तीन लोकांचा मृत्यू झाला आणि पोलीस अधिकाऱ्यांसह किमान दोन डझन लोक जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या उपअधीक्षक दर्जाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचाही या घटनेत मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.