पुण्यात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून पुण्यातील हवेली तालुक्यात बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने घटनास्थळी बॉम्बशोध पथक रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे. ही वस्तू अभिमान रोहिदास गायकवाड यांच्या निदर्शनास आली आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याविषयी माहिती दिली. या दोघांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्य पी आय गजानन पवार यांना संपर्क केला.

(हेही वाचा – तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक आहात? तर तुमच्यासाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा)

दरम्यान, ही घटना लक्षात घेता तात्काळ मांजरी खुर्द याठिकाणी पोलीस पथकासह बॉम्ब शोध पथक दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी असी माहिती दिली की, खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आला आहे. ७,८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे ते आता वर आलेले दिसतेय आणि पोलीस, बॉम्ब शोध पथकाकडून तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here