माॅस्कोवरुन गोव्याला जाणा-या विमानात बाॅम्ब असल्याची धमकी; एमर्जेन्सी लॅंडिंग

माॅस्कोवरुन गोव्याला जाणा-या फ्लाइटमध्ये बाॅम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. या फ्लाईटमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी होते. फ्लाईटमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे एमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि बाॅम्ब स्काॅड घटनास्थळावर पोहोचले आहे.

गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बाॅम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर माॅस्को- गोवा चार्टर्ड फ्लाइटला गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. सध्या विमानाची तपासणी सुरु आहे.

( हेही वाचा: जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ भारतात; पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी करणार उद्घाटन )

धमकीनंतर एमर्जन्सी लॅंडिंग

माॅस्कोवरुन गोव्याला येणा-या फ्लाईटमध्ये बाॅम्ब असल्याची माहिती गोवा एटीसीला मिळाली होती. त्यानंतर विमान गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले. विमानाचे एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माॅस्कोवरुन 400 प्रवाशांना घेऊन जाणा-या विमानात बाॅम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले होते. CISF ला फ्लाईटमध्ये बाॅम्ब असल्याची धमकी मिळाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here