१ लाख बळी घेणाऱ्या वादळाने हादरला होता ‘बॉम्बे’ इलाखा

146

मुंबई म्हटले की संकटे हे समीकरण आहे. विशेषतः समुद्र किनाराजवळ असल्यामुळे या भुभागाला कायम नैसर्गिक आपत्तीचा धोका असतो. अशीच मोठी नैसर्गिक आपत्ती ६ जून १८८२ रोजी मुंबईत आली होती. या दिवशी इतके मोठे वादळ आले होते की या वादळामुळे तब्बल १ लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

११७ प्रती तास वेगाने धडकलेले वादळ

या वादळाला होक्स असे नाव दिले होते. हे वादळ ११७ प्रती तास वेगाने हे वादळ वाहत होते. अरबी समुद्रात आलेल्या या वादळाने काही तासांत होत्याचे नव्हते केले होते. हे आजवर आलेल्या वादळ पैकी एक मोठे वादळ होते. मुंबईतील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आठ दशांश लोकसंख्या ठार झाली होती.

वादळाचे ऐतिहासिक दाखले

  • या नैसर्गिक आपत्तीचे दाखले अनेक ठिकाणी मिळतात. केरी इमॅन्युएल यांनी या वादळावर ‘ ग्रेट बॉम्बे सायकलोन ‘ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
  • जॉन विथिंगटन यांचे २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ डिझास्टर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड: क्रोनिकल ऑफ वॉर, अर्थक्वेक, प्लेग अँड फ्लड ‘ या पुस्तकातही या वादळाचा उल्लेख केला आहे.
  • भारतीय हवामान खात्याकडेनेही वादळाची माहिती संकलित केली आहे. १८९१ मध्ये जे. इलिओट यांचे प्रसिद्ध झालेले ‘सायकलोन मेमरिज ‘ हे पुस्तक हवामान खात्याकडे आहे. त्यात १६४८ ते १८८९ दरम्यान अरबी समुद्रात आलेल्या वादळाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील या वादळाची माहिती आहे.

page 8

  • डेव्हिड लाँगशोर यांनीही त्यांच्या पुस्तकात होक्स वादळाची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.