Money Laundering Case: मलिकांना दिलासा नाहीच! सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं म्हटलं…

164

मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काही दिवस तुरूंगातील मुक्काम कायम राहणार आहे. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 6 जानेवारी 2023 पर्यंत पुढे ढकलली आहे.

13 डिसेंबर रोजी न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

(हेही वाचा – ‘तुमची उंची किती, बोलता किती? बाईने बाईसारखं…’, सुषमा अंधारेंवर ‘मनसे’चा हल्लाबोल)

न्यायालयाने दिला तात्काळ सुनावणीस नकार

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी फेटाळला होता. यानंतर नवाब मलिक यांच्या वतीने तारक सय्यद आणि कुशल मोरे या वकीलांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीच्या सुनावणीसाठी नवाब मलिक यांच्या वतीने 12 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. 13 डिसेंबर रोजी न्यायाधीश एमएस कर्णिक यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायाधीशांनी 6 जानेवारी 2023 पर्यंत स्थगिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.